Posts

Showing posts from February, 2022

झिम्मा

Image
एक नितांत सुंदर , प्रेक्षणीय सिनेमा , Amazon Prime वर पाहण्यात आला.    प्रथमदर्शनी एखाद्याला सहज वाटेल सगळेच तर आहे (म्हणजे पैसा) त्या सातजणींकडे ,  मग कसले आलेय दु:ख ? सुख खुपतंय दुसरं काय!! तर तसे नसते. . . सुखाला आणि दु:खालाही गरी बी , श्रीमंती कळत नाही. खूप मोठ्ठा आयाम असतो प्रत्येक गोष्टीला ,  हे आपण सहजपणे विसरतो. दु:ख हे दु:खच असते. पोत-पदर वेगवेगळा एवढेच !!   “ जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे ” या प्रमाणे समोरच्याच्या बुटात शिरून उभे राहून पाहता येत असेल तरच त्या प्रत्येकाच्या सुखदुःखाची तरलता जाणवू शकेल. झिम्मा च्या सातही नायिका सामाजिक दृष्टीने सर्वार्थाने सुखवस्तू आहेत. त्या UK ला हॉ लीडे ट्रिप ला जात आहेत यातच सगळे आले ! पण पैसाच सर्व काही असतो का हा मूलभूत प्रश्न हा सिनेमा पाहाताना सतत डोकावत राहतो. क्षिती जोगच्या नवर्‍याने डिप्रेशन मध्ये आत्महत्या केली आहे , हिला भरपूर पैसा ठेवून !! पण तरीही तो डिप्रेशन ची शिकार झाला होता , आत्महत्येच्या वाटेवर चालला होता हे तिला प्रेमविवाहाने त्याच्याशी बांधलेली असूनही कळलेच नव्हते , हा सल तिला सुखाने जगू देत नाहीये ,

कॉलेज जीवन

साधारण एक महिन्यापूर्वी एका मित्राच्या घरी त्याच्या वाढदिवसानिमित्त जमलो होतो. मिनी गेटटुगेदर च म्हणा ना! मध्ये मध्ये एकमेकांना भेटणे वेगळे आणि असे ठरवून भेटणे वेगळे , त्यामुळे कॉ लेज जीवनाच्या आठवणींना उजाळा मिळाला. त्यानंतर सहज सुचलेली कविता... फुलपाखरू , कॉ लेज जीवनाचे , अचानक येऊन बसले खांद्यावर... भुर्रकन उडून गेली , चाळीस वर्षे , नेऊन ठेवले उत्साही वळणावर !!   गावा-खेड्यातून आलेली साधीभोळी पोरे स्व कर्तृत्वाने जिंकली यशाची शिखरे   कॉ लेज रंगमंचावर सजवले रंग ते मजेचे सामाजिक आयुष्यात सत्यात उ भारले मनोरे स्वप्नांचे.   कुणी झाला ऑफिसर , कुणी बॅंकर तर कुणी बिल्डर , पण एकमेकांच्या मदतीला सगळेच सदैव तत्पर.   साठी पाठोपाठ आली संसारात स्वस्थता , पुन्हा कॉ लेज जीवनाच्या आनंदात रमण्याची मिळाली जणू मुभा.   कर्तबगार नवर्‍यांच्या बायका मात्र हुशार आणि समजूतदार , या टवाळखोरांना चांगलेच आणले आहे वठणीवर....   मना वाटते परत एकदा जावे सोनेरी त्या ७८ - ८१ दिवसांत... नव्याने अनुभवावे अन् हरवून जावे मित्रांच्या मोरपंखी सहवासात!!!!!   वीणा कुलकर्णी 🙏