Posts

Showing posts from August, 2023

चांगुलपणा...

           माझ्या मुलीने OTT Platform चा एक अजब खजिनाच जणू काही माझ्या समोर उघडून दिला आहे.         Sony liv वर हर्षद मेहता स्कॅम वर आधारित मालिका बघण्यात आली.हा स्कॅम ज्यांनी शोधला त्या सुचेता दलाल आणि देबाशिष बासू यांच्याच पुस्तकावर आधारित ही मालिका असल्यामुळे खरेखोटेपणा बद्दल दुमत नसावे.         मालिका जशीजशी पुढे सरकते तसेतसे हर्षद मेहता हा माणूस गुन्हेगार न वाटता , system चा बळी वाटू लागतो. कारण तो जर गुन्हेगार तर त्याला साथ देणारे बॅंक अधिकारी व त्याच्या कंपनीत पैसे गुंतवणारेही तेवढेच दोषी वाटू लागतात.  असो. आजचा विषय हा नाहीतर एकंदर सगळीकडेच सध्या खोटेपणाचा विजय होताना दिसतोय हा आहे.         चांगुलपणा हरत आहे का ??? खरोखर कलियुग अंतिम चरणात आले आहे का ?        कारण सध्या आजूबाजूला बघितले तर चांगुलपणाला किंमत उरली नाहीये असे दिसते.चांगल्या माणसांचेच वाईट होताना दिसत आहे. खरेपणाला कोणीही विचारताना दिसत नाही.        माझ्या मुलीने Good place नावाची मालिका Netflix वर बघितली. त्यात असे दाखवले आहे की God particles चा स्पर्श झाला की वाईट माणसेही चांगले वागू लागतात.        सध्या Good pla

|| मना सज्जना ||

      रामदास स्वामींनी ज्या मनाला 'सज्जना' संबोधून श्लोक लिहीले आहेत ते मन किती विचित्र, अचपळ असते याचा आपल्या सगळ्यांना चांगलाच अनुभव आहे.        परवा माझ्या मैत्रीणीने, सुरेखाने, सौ धनश्री लेले यांचा एक सुंदर व्हिडिओ पाठवला. त्यात त्यांनी यक्षाने धर्मराजाला विचारलेल्या प्रश्नाबद्दल सांगितले की 'काय आवरले तर शोक करावा लागत नाही?' यावर धर्मराजाने तात्काळ 'मन' हे उत्तर दिले.     पण मनाला आवरणे खरच इतके सोपे आहे का ??? माझ्या मते सर्वांचे उत्तर 'शक्यच नाही' हेच असणार. कारण  मन सतत इकडे तिकडे धावत असते,विचार करत असते. शांत बसला असाल तर अशांत करते.सतत चांगले-वाईट काही ना काही ज्याच्या डोक्यात भिरभिरत असते ते 'मन'!!        कुठेतरी वाचले होते ,की श्री दत्तगुरू म्हणजे ब्रम्हा,विष्णू,महेश !! Creator, Preserver, Destroyer: Body, Brain, Emotions!!     ब्रम्हा म्हणजे सरस्वतीचे वरदान म्हणजे अभ्यास, हा physically, Body ला करावा लागतो.      विष्णू म्हणजे Brain /मन. मन चांगले असेल तर बुध्दी ही चांगले विचार करते.      महेश Destroyer म्हणजे Emotions, ज्यामुळेच अन

फिनिक्स

     वर्षभरापूर्वी मी  'मोरपंख' मधून माझे मनोगत जसे जमेल तसे सादर करत होते. मित्रमैत्रिणींना आवडत होते याहून अधिक काय हवे? मी खूष होते.       पण नंतर असे काही दुःखाचे डोंगर  कोसळले की ते पार करून लिखाण करण्याइतके त्राण तर उरले नाहीच पण डोकेही फक्त प्रश्न सोडवण्यात गुंतून गेले.     असो. आयुष्यात अशा सुख-दुःखाच्या लाटा येतच रहाणार, त्या पार करण्यावाचून आपल्या हातात काय असते?      आज माझा 62 वा वाढदिवस!  माझ्या वसंत फडके या वर्गमित्राने मला शुभेच्छा दिल्या व म्हणाला की, चल ,आजच्या मुहूर्तावर लिहायला सुरूवात कर. आणि खरंच मला ते भावले.     असे जिवलगच तर असतातच, जे आपल्याला पुन्हा उभे राहण्याची ताकद देतात. जया,राजेश,मकरंद, आणखी किती नावे घेऊ!!! तो एक वेगळाच लेख होईल.      हे मुद्दाम लिहिण्याचे कारण, आपण प्राॅब्लेम मध्ये  असलो की मन मोकळे करण्याची खूप गरज असते. त्यातून दुःखाचा निचरा होतो. अश्यावेळेस मनाला उभारी देणारे जिवलग असणे हे भाग्याचे लक्षण आहे.      कारण परवा ज्येष्ठ कलावंत नितीन देसाईंची आत्महत्या मनाला चटका लावून गेली. पत्नी,तीन मुले, नातेवाईक,  मित्र परिवार यापैकी कुठेच मन म