Posts

Showing posts with the label Morpankh Blog Jhimma AmazonPrime Marathi Film Suhas Joshi Nirmiti Sawant Sonalee Kulkarni Siddharth Chandekar Kshitee Jog Suchitra Bandekar Sayali Sanjeev Mrinmayee Godbole Hemant Dhome Anant Jog

झिम्मा

Image
एक नितांत सुंदर , प्रेक्षणीय सिनेमा , Amazon Prime वर पाहण्यात आला.    प्रथमदर्शनी एखाद्याला सहज वाटेल सगळेच तर आहे (म्हणजे पैसा) त्या सातजणींकडे ,  मग कसले आलेय दु:ख ? सुख खुपतंय दुसरं काय!! तर तसे नसते. . . सुखाला आणि दु:खालाही गरी बी , श्रीमंती कळत नाही. खूप मोठ्ठा आयाम असतो प्रत्येक गोष्टीला ,  हे आपण सहजपणे विसरतो. दु:ख हे दु:खच असते. पोत-पदर वेगवेगळा एवढेच !!   “ जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे ” या प्रमाणे समोरच्याच्या बुटात शिरून उभे राहून पाहता येत असेल तरच त्या प्रत्येकाच्या सुखदुःखाची तरलता जाणवू शकेल. झिम्मा च्या सातही नायिका सामाजिक दृष्टीने सर्वार्थाने सुखवस्तू आहेत. त्या UK ला हॉ लीडे ट्रिप ला जात आहेत यातच सगळे आले ! पण पैसाच सर्व काही असतो का हा मूलभूत प्रश्न हा सिनेमा पाहाताना सतत डोकावत राहतो. क्षिती जोगच्या नवर्‍याने डिप्रेशन मध्ये आत्महत्या केली आहे , हिला भरपूर पैसा ठेवून !! पण तरीही तो डिप्रेशन ची शिकार झाला होता , आत्महत्येच्या वाटेवर चालला होता हे तिला प्रेमविवाहाने त्याच्याशी बांधलेली असूनही कळलेच नव्हते , हा सल तिला ...