Posts

Showing posts from April, 2022

समंजसपणा.

1.  अंजलीला रात्रभर झोप लागली नव्हती. तिच्या मुलाचा शाळेचा आज पहिलाच दिवस ! शांत, अबोल असा मुलगा शाळेत कसा काय ॲडजेस्ट होईल, कसे मित्रमंडळ जमवेल या विचाराने ती संचित होती.      शेवटी त्याला शाळेत सोडून ती घरी आली. शाळा सुटायच्या वेळेपर्यंत तिची घालमेल सुरूच होती. कधी एकदा शाळेत पोचून त्याला बघते, बाईंना सगळे विचारते असे तिला झाले होते.      शाळेत पोचली तर मुलगा स्मितहास्य करत बाईंजवळ उभा होता.     बाई म्हणल्या, "तुमचा मुलगा खूपच बोलका,मनमिळाऊ आहे हो आणि बऱ्यापैकी धीट ही, मारामारी करणाऱ्या मुलांना समजावून थांबवले त्याने"     अंजली चकीत झाली !! तिचा मुलगा समंजसपणे तिच्याकडे हसत बघत होता.    आता तिला कळले, उगाचच अती काळजीने तिचाच जीव पोखरला होता. मुलगा मात्र नवीन आव्हाने पेलायला उमेदीने तयार होता, समंजसपणे !!!!! 2.   माधवराव पेपर वाचत सोफ्यावर बसले होते पण लक्ष मात्र किचनमधून येणाऱ्या आवाजावर होते.      मोहित अमेरिकेहून आला होता त्यामुळे घरात खुशीचे वातावरण होते. आई मालतीबाई लाडक्या लेकाला गरमागरम कांदा भजी तळून देत होत्या, त्याचा आस्वाद लेक ओट्यावर बसूनच घेत होता. बाजूलाच लाडकी

परमात्मा 🙏🙏

     आपण सगळेच भूगोलात शिकलो आहोत, पृथ्वीचा आस कललेला आहे. तो कललेले नसता तर......तर विषुववृत्ताचा जळून कोळसा झाला असता आणि उत्तर- दक्षिण ध्रुव गोठून गेले असते. बाकी ठिकाणांचे काय झाले असते कल्पनाच नको.        पण तसे झाले नाहीये कारण तो, जगन्नीयंता !!!!    त्याने तसे होऊन दिले नाहीये. त्याने सगळे कसे आखीवरेखीव मांडून ठेवले आहे .      अगदी,ओळीत-नीटनीटके !!! एक व्हिडिओ पाहिला होता, आकाशगंगे पासून सुरुवात करत करत लहान लहान होत शेवटी मुंगी एवढासा मनुष्यप्राणी !!!!!      कित्ती छोट्टासा जीव पण गमजा केवढ्या ????      कधी असा व्हिडिओ बघितला की अचंबा वाटतो व थक्क व्हायला होते या सगळ्या अफाटतेने !!! कमाल वाटते हे सगळेच बनवणाऱ्या परमात्म्याची 🙏🙏      आपण आपल्यातच,आपल्या छोट्याशा विश्वातच इतके गर्क असतो की ह्या सगळ्याची जाणीवच नसते, कृतज्ञता नसते.       बघा विचार करून किती अनभिज्ञ असतो आपण आपल्या आजूबाजूच्या कितीतरी गोष्टींबद्दल. आपल्या लक्षातच येत नाहीत.       अगदी ब्रम्हांडापासून सुरवात करत चंद्रापर्यंत !!! कसा अगदी तो योग्य अँगल ने फिरवत ठेवला आहे, योग्य गुरुत्वाकर्षणात, भरती-ओहोटी च्या टाईम

सुख....

     मनापासून डोळे मिटून शांत बसा व आठवा, 'एकदम  सुखी-समाधानी वाटलेला क्षण'...आठवा, मस्त आनंदी अनुभवलेला शेवटचा क्षण!!!!!     आठवला ???? बघा हं नाही म्हणून सोडून देऊ नका...परत प्रयत्न करा प्लीज....    सुख-समाधान म्हणजे नक्की काय असते ???    लहान बाळाचे गोड हास्य, चवदार  आमटीचा भुरका, कुंडीतील गुलाबाला खूप दिवसांनंतर आलेले फुल, मित्रांच्या मैफिलीत अनुभवलेला मोकळेपणा.......असे कितीतरी छोटे छोटे सुखदायक क्षण, जे सहज विस्मरणात जातात आणि आपल्याला खंत वाटते, आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण हरवले की काय???       खरंतर ते हरवलेले नसतातच, ते आपल्यातच असतात व ते जपून ठेवायचे असतात, मनापासून, मनासाठी !!!       मग असे सुखी, आनंदी ,समाधानी क्षण भरपूर आठवतील !!!      आता आठवा बरं, सगळ्यात आनंदायक क्षण !!!      मग झाली ना सुखी विचारांची भाऊगर्दी एक एक आठवता आठवता......   अगदी लहानपणापासून ते दहावी झाल्यापासून, लग्न वगैरे वगैरे कितीतरी.....आपल्याला मुले झाली, त्यांचे पहिले पाऊल, पहिलाच बोबडा शब्द, संसारातील-नोकरीतील आनंदाचे क्षण, नातेवाईक-मित्रमैत्रिणीं च्या सहवासातील हसरे क्षण......     खूप म्

'नाही' चे महत्त्व

    ऑफिसमध्ये माझा एक सहकारी होता. तो मला नेहेमीच म्हणत असे , 'नाही' म्हणायला शिका, सगळ्यांना सगळेच देणे आपल्याला जमणारे नाही.      खरे होते ते !! लोकांना सर्व्हिस देण्याच्या कामात तुम्ही असाल तर खरच सगळ्यांनाच 'हो' म्हणणे जमणारे नसते. म्हणजे योग्य ते काम करणे गरजेचेच असते पण अवास्तव मागण्यांवर विचार करावाच लागतो.      पण 'नाही' म्हणणे इतके सहज सोपे असते का???? खरे उत्तर 'नाही' !!!! नाही SS नाही SS ' नाही' हेच उत्तर आहे !!!!     अर्थात 'नाही' म्हणताना कितीही मुद्देसूदपणे तुम्ही समजावले, तरी समोरच्याला ते सहसा पटत नाहीच, कारण सहसा सगळेच 'उत्तर ' देण्यासाठीच ऐकत असतात, ना, 'समजून' घेण्यासाठी !!! आपण बहुतेकवेळा सगळेजणच समोरच्याचे ऐकत असतो (म्हणजे नसतो) व आपल्या मनात त्यावर देण्याची 'प्रतिक्रिया/उत्तर ' तयार करत असतो.     अगदी समोरचा त्याची सुख/दुःखाची कहाणी सांगत असेल तरीही आपल्या मनात आपलीच कहाणी तयार होत असते.       एकूण काय 'ऐकणे' ही ही एक कलाच आहे. सहजसाध्य न होण्यासारखी !!!!!!      तर अजून एक,काही माणसे