Posts

Showing posts from September, 2023

आनंद

        गणपती गजानन आले आहेत. सगळीकडे उत्साहाचे, आनंदाचे वातावरण आहे. सहाजिकच ह्या आनंदाचा संसर्ग सगळ्यांनाच होतो व सगळीकडे आनंदी वातावरण पसरते. देवळातला जादूचा लोलक अलगद हातात येतो.         आनंद ही मनाची भावना आहे. आजूबाजूला जर आनंदी वातावरण असेल तर आपणही त्यात नकळत सामिल होऊन जातो.        एकंदरच सगळ्या भावना मनाच्या कारक आहेत. मन आनंदी तर तुम्ही आनंदी !!!        एक म्हण आहे.... "Body in abyss, heart in paradise"        म्हणजेच तुमची Body/शरीर कितीही खड्ड्यात/ पाताळात/ abyss मध्ये गेलेली असेल पण तुमचे मन / heart जर स्वर्गात / paradise मध्ये असेल तर तुम्हाला खड्ड्यातही सुंदरता, आनंद मिळू शकतो.        थोडक्यात काय बाह्य गोष्टींवर आपला आनंद अवलंबून नसतो तर आंतरिक दृष्ट्या  जर तुम्ही सुखी, समाधानी असाल तर बाह्य गोष्टींनी काहीही फरक नाही.        हे सगळे पटते, वाचायला, ऐकायला आवडते मग घोडे कुठे अडते? तर........मन !!!!!         स्वतः रामदास स्वामी ही जिथे म्हणतात... परम दिनदयाळा नीरसी मोहमाया ॥  अचपळ मन माझे नावरे आवरिता |  तुजविण शिण होतो धाव रे धाव आता ॥        पण तिच करूणाष्टके

कुटुंब

     माझी एक मैत्रीण आहे. सेवानिवृत्त होऊन पाच सहा वर्ष झाली. सहजच कधीही फोन करा, ती बिझीच असते. खरेतर मला त्या गोष्टीचा कधीकधी हेवाही वाटतो.      पण कधी तिची कीवही येते. कारण ती म्हणते, माझा संसार झाला, आता मुलाचा करत आहे.     कारण आम्ही नोकरीला जात होतो, तेव्हा सकाळी आठची मालाडलोकल पकडत असू. त्यामुळे डबे, घरचे सगळेच आवरण्यासाठी सकाळी पाच ला उठणे अपरिहार्यच होते. नंतर संध्याकाळी ही जेवण, मुलांचा अभ्यास, इतर कामे आलीच. शनिवार, रविवार बाकी पसारा आवरण्यात जात असे. एकंदर बिझी असे दिवस होते. वय होते, उमेद होती, मजा वाटत होती सगळे करण्यात!!!!       पण आता तिचा दिवस अजूनही सकाळी पाचला च सुरू होतो. मुलाचा, सुनेचा डबा बनवण्यात मदत करण्यासाठी !! नंतर दिवस जातो नातवंडाचे करण्यात  !!      ती म्हणते निवृत्ती मिळलीच नाहीये.     एकंदर काय एक पुती रडते आणि सात पुतीही रडते. कारण माझा मुलगा ऑस्ट्रेलियात असल्याने मी तशी बिझी नाहीये. घरातली थोडीफार कामे केली की दिवस तसा रिकामाच असतो. अर्थात घरातली कामे, वाचन,  OTT, भाजीपाला आणणे यात वेळ जातोच पण कुठेतरी मुलाबाळांची, नातवंडाची कमतरता जाणवते.     आपण आपल्य

लोलक

देवाच्या देवळातून चोरून आणलेला लोलक  हरवला माझ्या हातून, तेव्हा डोळ्यातली फुलपाखरे उडून गेली  आणि विझली पाण्याच्या थेंबातली इंद्रफुले, आता गवत नुसतेच हिरवे दिसते,  आभाळ नुसतेच निळे, घराघरांना, माणसांना फुटतच नाहीत इंद्रधनुष्याचा रेषा. एकदा एक पोर आली उड्या मारीत  हातांचे पंख पसरून, डोळे विस्फारून  खिदळत मला म्हणाली, ‘ गमत बघ, गवत हिरवे नसते, आभाळ निळे नसते, आणि माणसे असतात इंद्रधनुष्याची बनवलेली, माहीत आहे तुला?’  माझा लोलक हिला कुठे सापडला? देवळातल्या झुंबराला किती लोलक आहेत अजून? - शांता शेळके        लोलक ही शांताबाई शेळके याची कविता एकदा सलील कुलकर्णी यांनी झी मराठी वरील एका गाण्याच्या कार्यक्रमात म्हणून दाखवली होती. व सांगितले की तुमचा लोलक कोणत्याही परिस्थितीत  हरवू देवू नका वगैरे वगैरे !!!!         पण आपल्या आयुष्यात नेहमीच सुख असते का की आकाशही रंगीत दिसावे ?? कधीकधी तर कठीण प्रसंग येतात तेव्हा तर आपण विसरूनच जातो की आपल्याकडे लोलक आहे.         मग कसे बरे लोलक सांभाळून ठेवायचा ? तर प्रयत्न तर आपल्या हातात आहेत की लोलक हरवू न देणे !!         छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद शोधत राहि

अनमोल!!

      तामिळनाडूतील कुंभकोणम जवळच्या शिवमंदिरात दहा पायऱ्या आहेत. ज्यातून सारेगमपधनी आणि ओमकार ध्वनी उमटतात. तसेच हंपी येथील विठ्ठल मंदिरात ही सारेगमप स्वर निर्माण करणारे खांब आहेत.       अशा एकाहून एक अद्भुत वास्तू भारताभर पसरल्या आहेत.अतिशय अनमोल असा ठेवा भारतात आहे तेवढा अन्य कुठे सापडत नाही.        पण दगडातून ही संगीत निर्माण करणाऱ्या भारत देशात आता त्याच अद्वितीय वास्तू , लोकांनी दगड मारून आवाज निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे , जाळीमध्ये बंदिस्त करून ठेवण्याची वेळ आली आहे.        एकंदर विचार करता, त्या मानाने दक्षिण भारतातील अशी अनमोल स्थळे सुरक्षित राहिली कारण आपले शिवाजीमहाराज!! उत्तरेत पसरलेले मोंगली वादळ या राजाने मध्येच थोपवून ठेवले व दक्षिण भारत थोड्या  प्रमाणात का होईना विध्वंसा पासून वाचला.       अशा अनमोल वास्तू आहेत त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहेच पण त्या आपल्यापासूनच सुरक्षित आहेत कां ? हा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो.       आपल्या संस्कृतीतील सभ्यता कधी लोप पावली ??        10-12 व्या शतकापर्यंत बहुदा सगळीकडे भरभराट, उन्नती होती. त्यानंतर घसरण सुरू झाली असावी. कारण 7