Posts

Showing posts from May, 2022

करोना नंतर.....

    मध्ये वाॅटस् ॲपवर एक चांगली पोस्ट वाचनात आली, डॉक्टर प्रकाश कोयाडे लिखित. त्यात असे म्हटले होते की, कोविड नंतर लोक बदलतील, पुन्हा मिळालेल्या संधीमुळे!! पण त्या भयानक परिस्थिती नंतर आता काय दिसून येत आहे ?? घाणेरडे राजकारण, धर्मकारणच !! शंभर वर्षांपूर्वी युरोपात आलेल्या साथीमुळे तिथे बंद नाले, साफसफाई इत्यादी जे जे चांगले सुरु झाले ते आजतागायत !! त्या लेखात पुढे प्रश्न विचारला होता की पुन्हा जर अशी काही आपत्ती आली तर आपली काय तयारी आहे ??????      खूप अंगावर येणारा लेख,तो ही एका डाॅक्टर ने लिहीलेला, त्यामुळे मन जास्त विषण्ण झाले. कारण खरोखरच करोना मुळे खालावलेल्या आर्थिक, सामाजिक व मुख्य म्हणजे मानसिक स्थितीला पुन्हा वर आणण्यासाठी आपल्याकडे काय उपाय योजले जात आहेत हा एक संशोधनाचाच विषय ठरावा !!     भारत व ऑस्ट्रेलिया या दोन देशांत तुलना करण्याइतका माझा अभ्यास नाही पण माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला माझ्या सामान्य पातळीवर जे काही चांगले दिसते ते नक्कीच नमूद करावेसे वाटते.     करोना चा पहिला भर ओसरल्यावर  ऑस्ट्रेलियात लोकांना जमिन घेण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी सरकारने एक स्कीम काढली,

लोकशाही

मला अचानक एक शोध लागला. (अर्थात तो सगळ्या जगाला आधीच माहित होता) पण माझ्यासाठी मात्र तो 'युरेका' क्षण होता.      आपण भूगोलात शिकलो आहोत, उगवत्या सूर्याचा देश - जपान, पण सहजच गुगल गुरू वर फिरताना कळले की, ऑस्ट्रेलियाच्या जपान एक तास मागे आहे तर न्यूझीलंड दोन तास पुढे आहे !!!!!        माझ्या वाचनात आल्याप्रमाणे ऑस्ट्रेलिया हा ॲबोरजिनलस् (मूळ आदिवासी) चा देश होता. ते भरगच्च जंगलात, लहान-मोठ्या पशुपक्ष्यांच्या सहवासात आनंदात रहात होते. ब्रिटिशांनी (नेहमीप्रमाणेच) या देशावरही स्वारी केली. मग आपल्या देशातील कैद्यांना इथे वसायला दिले. नंतर खाणींच्या या देशात सगळ्या जगभरातून माणसांची रीघ लागली- खाणी उत्खननासाठी !!!      न्यूझीलंड मध्ये मात्र परिस्थिती थोडी वेगळी होती. तेथील माओरी आदिवासी मुळातच बऱ्यापैकी सुशिक्षित असल्याने, ब्रिटिशांना माओरींना आपल्या सर्व व्यवहारात सामिल करून घ्यावे लागले असावे.    ऑस्ट्रेलियात मात्र वेगळी परिस्थिती होती. आजचा ऑस्ट्रेलिया उभा करण्यासाठी ब्रिटिशांना खूप मेहनत घ्यावी लागली. त्यामुळेच वेळोवेळी आदिवासींवर त्यांच्या कडून झालेल्या त्रासाबद्दल ते मागत असलेली

वैदिक आश्रम व्यवस्था

    मी सध्या मेलबर्न, ऑस्ट्रेलियात आहे. माझे मत कदाचित चूक असू शकेल. पण माझ्या पाहण्यात असे आले आहे की, इथे लोक सेवानिवृत्त होत नसावेत. अगदी सत्तर वर्षांपासून पार अगदी ऐंशी -पंच्याऐंशी पर्यंत ची माणसे शिकतही आहेत आणि शिकवतही आहेत !! अर्थात मी हे शैक्षणिक क्षेत्राबद्दल बोलत आहे बाकी क्षेत्रांची मला माहिती नाही.      या गोष्टीचे आपल्याकडे खूप कौतुक आहे पण कदाचित वानप्रस्थाश्रमात जगण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या मला हे कुठेतरी खटकते. (अर्थात मला विचारतेय कोण हा मुद्दा वेगळा !!)     कमी लोकसंख्या हे एक महत्वाचे कारण असू शकेल कां?? पण या गोष्टींचा तरुण पिढीला मिळणाऱ्या संधींवरती नक्कीच परिणाम होत असणारच!! त्यामुळेच सरकारी अनुदानावर जगणारी (भरकटलेली?) तरुण पिढी वाढत असावी का? खरेतर इथे वयस्कर लोकांची सरकार उत्तम काळजी घेते. (त्यांनीच आयुष्यभर भरलेल्या टॅक्सच्या पैशातून ही का असेना) असेही वाचनात आले आहे. तरीही.....     एवढा अभ्यास माझा नक्कीच नाही. वरवर दिसते तसे नसूही शकते. पण प्रकर्षाने हजारो वर्षांपासून चार आश्रमांचे महत्व जाणणारी वैदिक भारतीय संस्कृती फारच प्रार्थनीय वाटली. 🙏🙏     भारतात ब