Posts

Showing posts with the label morpankh blog college university KKV old memories

कॉलेज जीवन

साधारण एक महिन्यापूर्वी एका मित्राच्या घरी त्याच्या वाढदिवसानिमित्त जमलो होतो. मिनी गेटटुगेदर च म्हणा ना! मध्ये मध्ये एकमेकांना भेटणे वेगळे आणि असे ठरवून भेटणे वेगळे , त्यामुळे कॉ लेज जीवनाच्या आठवणींना उजाळा मिळाला. त्यानंतर सहज सुचलेली कविता... फुलपाखरू , कॉ लेज जीवनाचे , अचानक येऊन बसले खांद्यावर... भुर्रकन उडून गेली , चाळीस वर्षे , नेऊन ठेवले उत्साही वळणावर !!   गावा-खेड्यातून आलेली साधीभोळी पोरे स्व कर्तृत्वाने जिंकली यशाची शिखरे   कॉ लेज रंगमंचावर सजवले रंग ते मजेचे सामाजिक आयुष्यात सत्यात उ भारले मनोरे स्वप्नांचे.   कुणी झाला ऑफिसर , कुणी बॅंकर तर कुणी बिल्डर , पण एकमेकांच्या मदतीला सगळेच सदैव तत्पर.   साठी पाठोपाठ आली संसारात स्वस्थता , पुन्हा कॉ लेज जीवनाच्या आनंदात रमण्याची मिळाली जणू मुभा.   कर्तबगार नवर्‍यांच्या बायका मात्र हुशार आणि समजूतदार , या टवाळखोरांना चांगलेच आणले आहे वठणीवर....   मना वाटते परत एकदा जावे सोनेरी त्या ७८ - ८१ दिवसांत... नव्याने अनुभवावे अन् हरवून जावे मित्रांच्या मोरपंखी सहवासात!!!!!   वीणा कुलकर्णी 🙏 ...