Posts

Showing posts from December, 2023

Love Yourself

     जगभरात एक नवीनच ट्रेंड प्रचलित झाला होता YOLO means You Only Live Once!! आणि आता नवीन ट्रेंड आला आहे Love Yourself!!!!!       एकच आयुष्य आहे तेव्हा मनसोक्त जगून घ्या. जगाची पर्वा न करता मनासारखे जगा, स्वतःसाठी जगा. स्वतःवर प्रेम करा.      यावर विचार करता हे खरच सत्य आहे का की माणूस हा स्वतः साठी न जगता कायम दुसर्‍यांसाठीच जगत असतो, त्यामुळे Love Yourself तत्वज्ञान सर्वांनी आत्मसात करायला हवे ?      तर यावर माझे स्पष्ट मत आहे की नाहीच....माणूस हा सतत स्वतःसाठीच जगत असतो, दुसर्‍यांसाठी नाहीच. अर्थात स्वार्थत्याग करून दुसर्‍यांसाठीच जगलेली उदाहरणे नक्कीच आहेत पण ती फार कमी !! नाहीतर पिल्लाला पायाखाली घेणाऱ्या माकडीणीचीच गोष्ट खरी.      अर्थात मला आलेल्या अनुभवांवरून माझे हे मत झाले असेल. प्रत्येकाचे अनुभव वेगळे त्यामुळे मतही वेगळेच. त्यामुळे कुणाला दुखावण्याचा माझा हेतू नाही.      पण आजूबाजूला बघितल्यास असे दिसते की माणसे एकमेकांना जरूर मदत करत असतात पण त्यात स्वार्थ दडलेला असतो अथवा कर्तव्य भावना !!!      आपण सामान्य माणसे आहोत सावरकर, भगतसिंग आदि प्रभृतींना आपण ईश्वर स्वरूप मानतो,

जीवन

    आज सकाळीच माझा मूड ठीक केला आमच्या दूधवाल्याने !! अर्थात रोजच तो गाणे गुणगुणत सगळ्यांच्या दुधाच्या पिशव्या देत असतो.पण आज मला ते प्रकर्षाने जाणवले व त्याने मूड ठीक केला.      जीवनात आलेले वाईट प्रसंग त्यानंतर पुन्हा आलेले चांगले दिवस या चक्रात कधीकधी त्या झाकोळातून मन बाहेर येऊ देत नाही. कधी खूप उदास वाटत रहाते अशावेळेस असा दूधवालाही नवीन उमेद देऊन जातो.       पण खरे बघायला गेल्यास दिसते तसे नसते. बहुतेक माणसे मुखवटा घालूनच फिरत असतात. वरवर सगळे ठीकठाक दिसले तरी आतील खळबळ मुखवट्या आडच रहाते, जगापासून लपूनच !! अर्थात हा मानवी स्वभावच आहे. सुख जगासोबत वाटले जाते तर दुःख मात्र  लपवून ठेवले जाते किंवा भारीतभारी एकदम जवळच्याच माणसांसमोरच ते मोकळे केले जाते.       पण आज सकाळी मला दूधवाल्याचे खूपच कौतुक वाटले. त्याला नसतील का विवंचना, दुःखे ?? पगार तो कितीसा, मेहनत ही खूप तरीही तो आहे त्या परिस्थितीत गाणे गुणगुणत आनंदात रहात आहे.      खरोखर जीवनात आलेले वाईट प्रसंग, दुःखद घटना विसरून नव्या उमेदीने जगणे शिकवणारा दूधवाला माझा आजचा गुरू !!!       श्री दत्तगुरूंनी जसे चौवीस गुरू केले तसे नवीन

धिंगाणा....

    ' स्टार प्रवाह ' वर दर शनिवार रविवार रात्री नऊ वाजता एक कार्यक्रम चालूआहे -      ' आता होऊ दे धिंगाणा ' नावाचा !!      खरोखर धिंगाणा कार्यक्रम आहे. मला आधी असे कार्यक्रम आवडत नसत पण हा बघायला सुरुवात केली आणि आता त्यात इतकी गुंतत गेले की तो बघितल्या शिवाय चैन पडत नाही.      आता होऊ दे धिंगाणा सिझन 2 इतका आवडला की सिझन 1 OTT वर बघत आहे.      सिध्दार्थ जाधव खरोखर एक उत्साहाचा सळसळता झरा आहे, त्याची एनर्जी बघून आपल्याही अंगात चैतन्य सळसळावे.         या कार्यक्रमाच्या creative team चे करावे तेवढे कौतुक थोडे इतका सुंदर बसवला आहे हा कार्यक्रम! त्यात सिध्दार्थ जाधव चे सूत्रसंचालन! केवळ लाजवाब!! तो इतका या कार्यक्रमात मिसळून गेला आहे की तो  याच साठी बनला आहे इतका चपखल!!!!!        पहिली फेरी असते 'धून टाक'. म्हणजे धून वाजवली जाते आणि गाणे ओळखायचे असते. नंतरची फेरी असते 'बोबडी वळाली' त्यात दिलेल्या शब्दांमध्ये गाणे म्हणायचे असते व त्यांच्या टीम ने ते ओळखायचे असते. तर तिसरी फेरी असते 'रेखाटा पटापटा', यात दोघांनी चित्र काढून दाखवायचे व टीम ने ते ओळखायचे.