Posts

Showing posts from March, 2024

अभंगांचा गाथा

     राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥ कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रूळे माळ कंठी वैजयंती ॥ मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥ कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयानो ॥ सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥            राजस , सुकुमार असे विठ्ठलाचे रूप जणू मदनाचा पुतळा आहे , ज्याच्यापुढे सूर्यचंद्रांचे तेज ही कमी वाटत आहे.      विठ्ठलाने कस्तुरीचा मळवट भरला आहे आणि अंगाला चंदनाची उटी लावली आहे तर गळ्यात वैजयंती माळ शोभत आहे. मुकुट आणि कुंडलांमुळे चेहरा सुंदर दिसत आहे. त्या कडे बघणे जणू काही सुखाची परिसीमा आहे.      कमरेला सोनसळा आहे तर खांद्यावर पाटोळा पांघरला आहे , असा हा घननीळ सावळा दिसत आहे.       तुकाराम महाराज म्हणतात की जीवाला आता धीर निघत नाही, तुम्ही सगळ्यांनी एकत्र होऊन , त्या विठूराया च्या दर्शनाचा लाभ घ्यावा. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल,  श्री ज्ञानदेव तुकाराम,  पंढरीनाथ महाराज की जय ॥ 🙏🙏 वीणा कुलकर्णी  🙏🙏

अभंगांचा गाथा

      सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया | गोड तुझे रूप गोड तुझे नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राही ह्रदयामाजी ॥ तुका म्हणे कांही न मागे आणीक। तुझे पायीं सुख सर्व आहे ॥        रखुमाईचा पती असलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे माझे डोळे कायम बघत राहोत. विठ्ठला , तुझे रूप, नाम सर्वच खूप गोड आहे , तुझे प्रेम मला सदा सर्वकाळ मिळत राहू दे. विठ्ठला, मायबापा, तूच माझ्या ह्रदयात निरंतर रहावास असा मला वर दे.       तुकाराम महाराज म्हणतात,  विठ्ठला, तुझ्या पायाशीच माझे सर्व सुख आहे आणि याहून अधिक काहीही माझे मागणे नाही.      बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल , श्री ज्ञानदेव तुकाराम , पंढरीनाथ महाराज की जय ॥ 🙏🙏 वीणा कुलकर्णी 🙏🙏

अभंगांचा गाथा

    समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथे माझी हरी वृत्ति राहो॥ आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथे माझे आर्त नको देवा ॥ ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी । तेथे दुश्र्चित झणी जडों देसी॥ तुका म्हणे त्याचें कळले आम्हां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत  ॥     हे हरी तुमचे चरण व नजर विटेवर स्थिर आहे आणि तेथेच, हरी तुमच्या ठिकाणी माझी वृत्ती स्थिर राहो. देवा या शिवाय कोणत्याही मायेने भरलेल्या  पदार्थांत माझे मन जाऊ देऊ नकोस. हे देवा , ब्रह्मा इत्यादी उच्च पदांकडे मन जाऊ देऊ नकोस. कारण अशी पदे दुःखच देतात.       तुकाराम महाराज म्हणतात,  जे जे कर्मधर्म नष्ट होणारे, नाशिवंत आहे त्याचा मूळ अर्थ आता कळला आहे.     बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय ॥ 🙏🙏 वीणा कुलकर्णी 🙏🙏

अभंगांचा गाथा

    मी देहूरोड या जागी नियुक्तीला होते तेव्हा देहू या पवित्र ठिकाणी येणेजाणे होत असे.     जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा गाथा तेथेच माझ्या हाती आला. त्यातीलच काही अभंग मला समजले तसे........    सुंदर ते ध्यान उभे विटेवरी | कर  कटावरी ठेवूनिया ॥ तुळसीचे हार गळां कासे पितांबर | आवडे निरंतर तें चि रूप ॥ मकरकुंडले तळपती श्रवणी | कंठी कौस्तुभमणि विराजित ॥ तुका म्हणे माझे हें चि सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीने ॥     सुंदर असे ते विठ्ठलाचे रूप विटेवर उभे आहे, ज्याने कमरेवर हात ठेवले आहेत. गळ्यात तुळशीचे हार आहेत आणि कमरेला पितांबर नेसले आहे, असे ते सुंदर रूप कायमच आवडणारे आहे. गोलाकार व नक्षीदार अशी मकरकुंडले कानात शोभत आहेत व गळ्यात पवित्र असा कौस्तुभ मणि रूळत आहे. असे हे विठ्ठलाचे मनोहारी सुंदर मुख आवडीने पहाणे ह्यातच माझे सर्व सुख आहे.         असे श्री तुकाराम महाराज म्हणतात, तसेच आपणही म्हणूया.  बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय ॥ 🙏🙏 वीणा कुलकर्णी 🙏🙏

गुलाम

        राणी मुखर्जी व आमिर खानचा गुलाम चित्रपट आठवतोय ? तोच "आती क्या खंडाळा" वाला ?         श्रीमंत, नाजुकशी राजकन्या चित्रपटाची हिराॅईन तर आवारा, गुंड नायक !! पण चित्रपटाच्या शेवटी ती त्याच्या प्रेमाला बळी पडतेच.        अशा प्रकाराच्या कथानकाचा मोह भल्याभल्या दिग्दर्शकांना पडला अगदी शोमॅन राज कपूर ही या मोहातून सुटू शकला नव्हता. असो.         मुद्दा आहे तो अशा कथानकांचा समाजावर होणारा परिणाम!! कारण सिनेमा हे खूप प्रभावी माध्यम आहे. त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात समाजावर होत असतो.       खरतर सिनेमाला समाजाचा आरसा म्हटले जाते. म्हणजेच समाजात जे घडते तेच सिनेमात दाखवले जाते. पण कधी कधी उलटेही घडत असतेच की !!        तू मेरी नही तो किसी की भी नही अश्या प्रकारच्या कथानकांमुळे झालेले ॲसिड ॲटॅकस् अंगावर काटा आणतात.         गुलाम चित्रपट आला त्या काळातलीच एक गोष्ट!!        अशीच एक उत्तम करिअर असणारी ,चांगल्या घरातली, MBBS करणारी मुलगी !! एका मवाली तरुणावर भाळली. देवळात वगैरे लग्न करून त्याच्या झोपडीत रहायला गेली. शेवटी मारहाण असह्य झाल्यावर, गरोदरपणी आईवडीलांकडे परत आली. एक आयुष्