Posts

Showing posts from February, 2024

कलाविश्व

       मराठी टीव्ही मालिकांचे कलाविश्व कोणत्या टप्प्यावर उभे आहे तेच कळत नाहीसे झाले आहे.         एक जमाना होता , चित्रहार, गजरा, फक्त काही दिवसांतच संपणाऱ्या मराठी मालिका !! खूप छान दिवस होते ते ! सगळेच घरगुती, कौटुंबिक!! सर्वांनी एकत्र बसून पहावे असे.         आता मात्र मराठी मालिकांचे विषय पूर्णपणे बदलेले आहेत. ते आता कोणते वळण घेणार आहेत तेच कळत नाहीये.           OTT platform बद्दल तर न बोललेलेच बरा ! सेन्सॉरशिप नसल्यामुळे बेबंदपणे वाटेल ते दाखवता येते. ते असो...          मराठी मालिकां बद्दल बोलायचे म्हटले तर उदाहरणार्थ स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते ही मालिका !! यात तर सामुहिक बलात्कार,  छोट्या मुलीचे अपहरण इत्यादी दाखवून मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत.         झी, कलर्स,  सोनी, स्टार प्रवाह इत्यादी लोकप्रिय चॅनेलस् वरती सगळीकडे हाच प्रकार सुरू आहे. सगळ्याच मालिका असंबद्धपणे, वास्तव सोडून चालू आहेत, त्या ही अगदी सगळे सदस्य घरात असतात तेव्हा prime time ला !!         विवाहबाह्य संबंध, मारामारी, सुनेला छळणे, गुंडागर्दी, थोबाडीत मारणे, स्त्रियांचा अपमान हे सर्व इतके सर्रास झाले आहे

कौतुक

         कौतुक हा शब्दच एवढा प्रेरणादायी आहे की ज्याचे कौतुक केले की त्याला किती छान वाटत असेल!!!           Reality shows बघताना मला नेहेमीच एका गोष्टीचे खूप कौतुक वाटत असते ते Anchoring करणारे करत असलेले participants चे कौतुक!!         भले ते scripted असते पण किती ते सुंदर प्रेरणादायक बोलत असतात.  Participants चे कौतुक करताना थकत नाहीत.        Anchors प्रमाणे Judges चे ही कौतुक झाले पाहिजे त्यांच्या बोलण्याबद्दल!!        एकदा मनापासुन आठवून बघा की तुम्ही कधी कुणाचे मनापासून कौतुक केले आहे?? किती छान प्रसंग असतात नां ते !! आणि हे ही आठवा की कुणी तुमचे कौतुक केले आहे !!      माझ्या काॅलेजच्या आवारे या वर्गमित्राची joint family आहे. तो, त्याची बायको, दोन मुलगे, दोन सुना, दोन नातू !!       माझा दुसरा वर्गमित्र ह्या successful joint family चे कौतुक करत म्हणाला,की त्यांचे success, ते एकमेकांना देत असलेले श्रेय, मोठेपणा यात आहे. खरंच किती कौतुकास्पद ना !!         बहुतेक सगळ्या ऑफिसेस मध्ये Appraisal असते. त्याचा हेतू  कौतुकच असते !! त्या कौतुकामुळे अजून चांगले काम करण्याची स्फूर्ती सगळ्यांना