Posts

Showing posts from October, 2023

नकार

     माझा एक सहकारी होता. तो मला नेहमी सांगायचा की 'नाही' म्हणायला शिका.       आम्ही public service देण्याच्या ठिकाणी काम करत होतो. Users आपली गाऱ्हाणी, मागण्या  घेऊन येत असत. सगळ्यांच्या सगळ्याच मागण्या पूर्ण करणे शक्‍यच नसे. त्यामुळे त्याचे सांगणे पटण्यासारखेच होते पण नाही म्हणणे मला कठीण जात असे.      आता विचार केल्यावर पटते की नाही म्हणणे कधी कधी खूप गरजेचे असते. जे न करून आपण आपल्यालाच त्रास करून घेतो.       खरंतर लहानपणापासून आपल्याला नकारघंटाच तर वाजवायला शिकवलेले असते. सगळ्या लहान मोठ्या मुलांना हे करू नको, ते करू नकोस असेच शिकवले जाते. काय कर ते कुणीच सांगत नाही.       कुठेतरी वाचले होते की म्हणून म्हणे आपल्याकडे शास्त्रज्ञ तयार होत नाहीत कारण जिज्ञासाच मारून टाकली जाते. ते असो.      एवढी नकारघंटा वाजवायला शिकवूनही नाही म्हणणे आपल्याला कठीण जाते ते जातेच.      एवढेच कशाला Election मध्येही आपण NATO वापरत नाही.     बहुतेकांचा स्वभाव  जन्मतःच भिडस्त असतो. त्यामुळे मनाविरुद्ध का होईना 'हो' म्हटले जाते आणि मग मनाविरुद्धच कामे करावी लागतात.      खरेच इतके कठीण असते क

श्रवणभक्ती

     ऐकणे ही एक कला आहे. सर्वसाधारणपणे सगळ्यांना बोलायला आवडते. ऐकायला नाही.      खरतर देवाने आपल्याला एक तोंड व दोन कान दिले आहेत. कारण जेवढे बोलतो त्याच्या दुप्पट ऐकण्यासाठी !!!!         पण आपण काय करतो समोरच्याचे बोलणे आपण फक्त प्रत्युत्तर देण्यासाठीच ऐकत असतो. ऐकता ऐकता ही काय बोलायचे हा विचार करतच ऐकत असतो.        खरतर कधीकधी समोरच्याला उत्तर, सांत्वन, दिलासा असे काहीच नको असते. फक्त त्याला आपले मन हलके, मोकळे करायचे असते. त्याचे बोलणे, मनातली खदखद कुणीतरी फक्त ऐकून घ्यावी एवढेच त्याला वाटत असते.पण होते काय ऐकणारा एक तर नीट ऐकतच नाही अथवा उपदेशाचे डोस देतो अथवा स्वतः विषयीच बोलू लागतो.        खूप कमी लोक भेटतात जी मनापासून समोरच्याचे ऐकून घेतात, कसलाही सल्ला न देता !!!!        सुखाचे क्षण सर्वांसोबत वाटता येतात पण दुःख मात्र आपण आपल्या जिवलगांशीच बोलतो. त्यावेळेस उपदेशाचे डोस, सल्ले, पैसा,मदत या कशाचीच अपेक्षा नसते. ती गरज ओघाने येणार असतेच पण त्याक्षणी कुणीतरी आपले बोलणे फक्त ऐकत आहे एवढेच हवे असते. आपले बोलणे कुणीतरी ऐकावे एवढीच अपेक्षा असते.        मला वाटते आपण शाळा, कॉलेजात ह