जीवन
सकाळची कोवळी उबदार उन्हे तर कधी धगधगीत उष्णतेचे नकोसे वारे तर कधी सरीं वर सरींची हिरवीगार बरसात!! निसर्ग चक्र चालूच असते जसे आपले जीवन चालू असते. माणसांच्या जीवाला कधी उसंतच नसते. कधी ऑफिसातल्या तर कधी घरातल्या विवंचना तर कधी आनंदाचे उधाण. जीवनात सतत काही ना काही घडतच असते. मग माणसे विचार करतात एवढे काम होऊदे मग आहेच मजा. सकाळ उजाडली की संध्याकाळ, रात्रीची वाट बघायची. आज उजाडला की उद्या कधी होतोय. पाऊस कधी संपतोय आणि थंडी कधी येते याची वाट बघत रहातो. मग जगायचे कधी ? एकदा सगळे मार्गी लागले, सगळे एकदा परफेक्ट झाले की आरामात जगूया असे माणसे स्वतःशी म्हणत राहतात. पण सगळेच एकदम परफेक्ट असे कधी होते का ? आठवून बघा, खरंच असे कधी झालेय का ? घरी ओके असेल तर ऑफिसात कुरबुरी असतात. जर दोन्हीकडे ऑल इज वेल असेल तर तब्येत डोके वर काढते. म्हणून आनंदाने जगण्यासाठी वाट बघू नका, मुहूर्त काढत बसू नका. जगात असा कुठलाही प्राॅब्लेम नाही ज्यावर उत्तर नाही. वेळेनुसार सगळे ठीक होत जाते. म्हणून थ्री इडियट्स मध्ये सांगितल्या प्रमाणे हृदयावर हात ठेवा आणि म्हणा...ऑल इज वेल आणि बघा कसा हुरूप य...