Love Yourself

     जगभरात एक नवीनच ट्रेंड प्रचलित झाला होता YOLO means You Only Live Once!! आणि आता नवीन ट्रेंड आला आहे Love Yourself!!!!! 

     एकच आयुष्य आहे तेव्हा मनसोक्त जगून घ्या. जगाची पर्वा न करता मनासारखे जगा, स्वतःसाठी जगा. स्वतःवर प्रेम करा.

     यावर विचार करता हे खरच सत्य आहे का की माणूस हा स्वतः साठी न जगता कायम दुसर्‍यांसाठीच जगत असतो, त्यामुळे Love Yourself तत्वज्ञान सर्वांनी आत्मसात करायला हवे ? 

    तर यावर माझे स्पष्ट मत आहे की नाहीच....माणूस हा सतत स्वतःसाठीच जगत असतो, दुसर्‍यांसाठी नाहीच. अर्थात स्वार्थत्याग करून दुसर्‍यांसाठीच जगलेली उदाहरणे नक्कीच आहेत पण ती फार कमी !! नाहीतर पिल्लाला पायाखाली घेणाऱ्या माकडीणीचीच गोष्ट खरी.

     अर्थात मला आलेल्या अनुभवांवरून माझे हे मत झाले असेल. प्रत्येकाचे अनुभव वेगळे त्यामुळे मतही वेगळेच. त्यामुळे कुणाला दुखावण्याचा माझा हेतू नाही.

     पण आजूबाजूला बघितल्यास असे दिसते की माणसे एकमेकांना जरूर मदत करत असतात पण त्यात स्वार्थ दडलेला असतो अथवा कर्तव्य भावना !!! 

    आपण सामान्य माणसे आहोत सावरकर, भगतसिंग आदि प्रभृतींना आपण ईश्वर स्वरूप मानतो, त्यांची तुलना कोणाशीही होणे शक्य नाही.

     पण सर्वसामान्यपणे स्वार्थ,  कर्तव्य आणि प्रेम हेच जीवन जगण्याचे गमक आहे. बाकी अगदी सत्यतेने विचार करता माणूस स्वतःसाठीच जगत असतो हे कधीकधी खरे वाटू लागते. एकमात्र खरे, आपण एवढे नक्कीच करू शकतो....स्वतःसाठी जगता जगता दुसर्‍यांसाठीही जगू शकतो.



वीणा कुलकर्णी 🙏🙏

Comments

Popular posts from this blog

अभंगाचा गाथा १३

झिम्मा

अभंगाचा गाथा १२