कॉलेज जीवन
साधारण एक महिन्यापूर्वी
एका मित्राच्या घरी त्याच्या वाढदिवसानिमित्त जमलो होतो. मिनी गेटटुगेदर च म्हणा
ना! मध्ये मध्ये एकमेकांना भेटणे वेगळे आणि असे ठरवून भेटणे वेगळे,त्यामुळे कॉलेज जीवनाच्या
आठवणींना उजाळा मिळाला.
त्यानंतर सहज सुचलेली कविता...
फुलपाखरू,कॉलेज जीवनाचे, अचानक येऊन बसले
खांद्यावर...
भुर्रकन उडून गेली,चाळीस वर्षे, नेऊन ठेवले उत्साही वळणावर !!
गावा-खेड्यातून आलेली
साधीभोळी पोरे
स्व कर्तृत्वाने जिंकली यशाची शिखरे
कॉलेज रंगमंचावर सजवले रंग ते मजेचे
सामाजिक आयुष्यात सत्यात उभारले मनोरे स्वप्नांचे.
कुणी झाला ऑफिसर,कुणी बॅंकर तर कुणी बिल्डर ,
पण एकमेकांच्या मदतीला सगळेच सदैव तत्पर.
साठी पाठोपाठ आली संसारात
स्वस्थता,
पुन्हा कॉलेज जीवनाच्या आनंदात रमण्याची मिळाली जणू मुभा.
कर्तबगार नवर्यांच्या
बायका मात्र हुशार आणि समजूतदार,
या टवाळखोरांना चांगलेच आणले आहे वठणीवर....
मना वाटते परत एकदा जावे
सोनेरी त्या ७८-८१ दिवसांत...
नव्याने अनुभवावे अन् हरवून जावे मित्रांच्या मोरपंखी सहवासात!!!!!
वीणा कुलकर्णी 🙏
भुर्रकन उडून गेली,चाळीस वर्षे, नेऊन ठेवले उत्साही वळणावर !!
स्व कर्तृत्वाने जिंकली यशाची शिखरे
सामाजिक आयुष्यात सत्यात उभारले मनोरे स्वप्नांचे.
पण एकमेकांच्या मदतीला सगळेच सदैव तत्पर.
पुन्हा कॉलेज जीवनाच्या आनंदात रमण्याची मिळाली जणू मुभा.
या टवाळखोरांना चांगलेच आणले आहे वठणीवर....
नव्याने अनुभवावे अन् हरवून जावे मित्रांच्या मोरपंखी सहवासात!!!!!
Nice!
ReplyDeleteसुंदर आठवणींना उजाळा
ReplyDeleteSundar
ReplyDelete