'नाही' चे महत्त्व

    ऑफिसमध्ये माझा एक सहकारी होता. तो मला नेहेमीच म्हणत असे , 'नाही' म्हणायला शिका, सगळ्यांना सगळेच देणे आपल्याला जमणारे नाही.

     खरे होते ते !! लोकांना सर्व्हिस देण्याच्या कामात तुम्ही असाल तर खरच सगळ्यांनाच 'हो' म्हणणे जमणारे नसते. म्हणजे योग्य ते काम करणे गरजेचेच असते पण अवास्तव मागण्यांवर विचार करावाच लागतो.

     पण 'नाही' म्हणणे इतके सहज सोपे असते का???? खरे उत्तर 'नाही' !!!! नाही SS नाही SS ' नाही' हेच उत्तर आहे !!!!

    अर्थात 'नाही' म्हणताना कितीही मुद्देसूदपणे तुम्ही समजावले, तरी समोरच्याला ते सहसा पटत नाहीच, कारण सहसा सगळेच 'उत्तर ' देण्यासाठीच ऐकत असतात, ना, 'समजून' घेण्यासाठी !!! आपण बहुतेकवेळा सगळेजणच समोरच्याचे ऐकत असतो (म्हणजे नसतो) व आपल्या मनात त्यावर देण्याची 'प्रतिक्रिया/उत्तर ' तयार करत असतो.

    अगदी समोरचा त्याची सुख/दुःखाची कहाणी सांगत असेल तरीही आपल्या मनात आपलीच कहाणी तयार होत असते. 

     एकूण काय 'ऐकणे' ही ही एक कलाच आहे. सहजसाध्य न होण्यासारखी !!!!!!

     तर अजून एक,काही माणसे स्वतःचे घोडे असे काही दामटत असतात, की, समोरच्यांचे ऐकून घेणे त्यांच्या गावीही नसते. अशावेळेस कधीकधी स्वतःचे अवलोकनही करण्याची गरज असते, आपण असे तर वागत नाही नां ??

      एकंदर काय तर 'नाही' म्हणणे इतके सोपे नाही.

    जवळच्या नातेसंबंधात असेल तर ते 'नाही' कुणी ऐकूनच घेणार नाहीत. मित्रमंडळ 'चल यार कर दे' म्हणून गळ्यात पडेल. ऑफीससंबधात तर वरून प्रेशर आले तर कठीण होईल. 

    थोडक्यात, सगळेच बालहट्ट किंवा राजहट्ट !!!!!

     ठामपणे 'नाही' म्हणणे इतके सोपे नसते. पण कधी कधी ते जमवावेच लागते.

     आपले म्हणणे सकारात्मकरित्या समजावून सांगितले, समोरच्याचाच त्यातील फायदा दाखवला तर ते कदाचित पटू शकते पण सहसा नाही म्हणणे कठीणच काम असते !!!

     तरीही येनकेनप्रकारेण थोडक्यात 'नाही' म्हणून विषय संपवण्याचे बघायचे..... कितीही कठीण वाटले तरीही !!!

    तुम्हाला वेगळे काही सुचतेय की 'नाही' च !!!!!


वीणा कुलकर्णी 🙏

Comments

  1. Vasant Govind PhadkeApril 3, 2022 at 8:22 AM

    आवश्यक त्या त्या वेळी ठामपणे नाही म्णता आलेच पाहिजे, फक्त नाही म्हणायची घाई मात्र करू नये ...

    ReplyDelete
    Replies
    1. नाही म्हणणं त्या अर्थी खूप अवघड,पण नाही म्हणायला शिकणं ही काळाची गरज.पण त्याला स्वभाव पण तसाच लागतो परखड,सर्वांना जमेलच असं काही नाही पण प्रयत्न करायला काय हरकत आहे.छान लिहिलं वीणा 🙏🙏🙏💐

      Delete
  2. दोघांनाही छान काॅमेंट्स बद्दल धन्यवाद 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अभंगाचा गाथा १३

झिम्मा

अभंगाचा गाथा १२