लोकशाही
मला अचानक एक शोध लागला. (अर्थात तो सगळ्या जगाला आधीच माहित होता) पण माझ्यासाठी मात्र तो 'युरेका' क्षण होता.
आपण भूगोलात शिकलो आहोत, उगवत्या सूर्याचा देश - जपान, पण सहजच गुगल गुरू वर फिरताना कळले की, ऑस्ट्रेलियाच्या जपान एक तास मागे आहे तर न्यूझीलंड दोन तास पुढे आहे !!!!!
माझ्या वाचनात आल्याप्रमाणे ऑस्ट्रेलिया हा ॲबोरजिनलस् (मूळ आदिवासी) चा देश होता. ते भरगच्च जंगलात, लहान-मोठ्या पशुपक्ष्यांच्या सहवासात आनंदात रहात होते. ब्रिटिशांनी (नेहमीप्रमाणेच) या देशावरही स्वारी केली. मग आपल्या देशातील कैद्यांना इथे वसायला दिले. नंतर खाणींच्या या देशात सगळ्या जगभरातून माणसांची रीघ लागली- खाणी उत्खननासाठी !!!
न्यूझीलंड मध्ये मात्र परिस्थिती थोडी वेगळी होती. तेथील माओरी आदिवासी मुळातच बऱ्यापैकी सुशिक्षित असल्याने, ब्रिटिशांना माओरींना आपल्या सर्व व्यवहारात सामिल करून घ्यावे लागले असावे.
ऑस्ट्रेलियात मात्र वेगळी परिस्थिती होती. आजचा ऑस्ट्रेलिया उभा करण्यासाठी ब्रिटिशांना खूप मेहनत घ्यावी लागली. त्यामुळेच वेळोवेळी आदिवासींवर त्यांच्या कडून झालेल्या त्रासाबद्दल ते मागत असलेली माफी आजही ठायी ठायी दिसून येते.
माझ्या मते या सर्व संघर्षात हे दोन देश तसे जगाच्या इतिहासात थोडे मागेच राहिले.
मला मात्र गंमतशीरपणे असे वाटते, की हे दोन देश म्हणजे पाश्चिमात्य देशांचे धाकटे भाऊ तर आशियाई देशांचे सावत्र भाऊ असल्यासारखे आहेत.
हेच कारण असावे बहुदा- जपानचे जपानी भाषेत नाव आहे 'निप्पाॅन' म्हणजे 'उगवत्या सूर्याचा देश' आणि हुशार जपानने तसे ते जगासमोर आणल्याचे !!!
आता मात्र ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडने जगामध्ये पहिल्या पंगतीत बसण्यासाठी स्वत:ला सिद्ध केले आहे असे मला वाटते.
इथे एक मुद्दाम नमूद करण्यासारखे, सध्या ऑस्ट्रेलियात मतदानाचे वारे वहात आहेत. टीव्हीवर त्या संदर्भात एक जाहिरात लागते. त्यात सध्याचे पंतप्रधान स्काॅट माॅरीसन यांनी 'न' केलेल्या कामांची यादी सांगितली जाते, ज्यात ते म्हणत असतात, 'That's not my job' , यावर विरुद्ध पार्टीच्या या जाहिरातीत विरुद्ध पार्टीवाले पुढे सरळ म्हणतात जर ती कामे तुमची नाहीत तर तुम्हीच आम्हाला नको.
सध्या ट्रॅवर नोवाह चे व्हाईट हाऊस मधील भाषण गाजत असतानाच, ऑस्ट्रेलियातील या खऱ्याखुऱ्या लोकशाहीला मनापासून नमस्कार करावासा वाटला.
वीणा कुलकर्णी 🙏
छान, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड बद्दल नवीन माहिती...
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteखरंच नवीन माहिती मिळाली
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteचालू ठेवा लिखाण. छान लिहीताय.
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteखरं तर आपली लोकशाही आता अजीर्ण झाली आहे.तिचा अतिरेक होत आहे,तिला जर समृध्द आणि सुरक्षित करायचं असेल तर इतर देशांचे काही चांगले उपाय घ्यावे लागतील.प्रथम शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एक निरपराध शिक्षा नाही झाली पाहिजे हे धोरण बदलले पाहिजे कारण 99. सुटलेले अपराधी देश चालवतात.आणि एक निरपराध व्यक्तीस शिक्षा करतात.असो हे आपले विचार झाले.छान लिहिलंय, काहीतरी वेगळे वाचायला मिळाले अजून नवीन वाचायला मिळेल अशी अपेक्षा आहे.नमस्कार🙏🙏🙏
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Delete