फिनिक्स

     वर्षभरापूर्वी मी  'मोरपंख' मधून माझे मनोगत जसे जमेल तसे सादर करत होते. मित्रमैत्रिणींना आवडत होते याहून अधिक काय हवे? मी खूष होते.

      पण नंतर असे काही दुःखाचे डोंगर  कोसळले की ते पार करून लिखाण करण्याइतके त्राण तर उरले नाहीच पण डोकेही फक्त प्रश्न सोडवण्यात गुंतून गेले.

    असो. आयुष्यात अशा सुख-दुःखाच्या लाटा येतच रहाणार, त्या पार करण्यावाचून आपल्या हातात काय असते? 

    आज माझा 62 वा वाढदिवस! 

माझ्या वसंत फडके या वर्गमित्राने मला शुभेच्छा दिल्या व म्हणाला की, चल ,आजच्या मुहूर्तावर लिहायला सुरूवात कर. आणि खरंच मला ते भावले.

    असे जिवलगच तर असतातच, जे आपल्याला पुन्हा उभे राहण्याची ताकद देतात. जया,राजेश,मकरंद, आणखी किती नावे घेऊ!!! तो एक वेगळाच लेख होईल. 

    हे मुद्दाम लिहिण्याचे कारण, आपण प्राॅब्लेम मध्ये  असलो की मन मोकळे करण्याची खूप गरज असते. त्यातून दुःखाचा निचरा होतो. अश्यावेळेस मनाला उभारी देणारे जिवलग असणे हे भाग्याचे लक्षण आहे.

     कारण परवा ज्येष्ठ कलावंत नितीन देसाईंची आत्महत्या मनाला चटका लावून गेली. पत्नी,तीन मुले, नातेवाईक,  मित्र परिवार यापैकी कुठेच मन मोकळे करावेसे वाटले नसेल का त्यांना ?

   त्यावर एक मेसेजच आला वाॅटस ॲपवर!! अगदी साने गुरूजी, हिटलर पासून मनःशक्तीचे महाराज, भैय्यू महाराज तसेच सुशांत सिंग राजपूत आणि शीतल आमटें पर्यंत अनेक उदाहरणे त्यात दिली होती की ज्यांनी आपले जीवन स्वहस्ते संपवले.

    मग जाणवले, आपल्यासारखी सामान्य माणसेच बरी !!

   आपण आपल्या गोतावळ्याच्या आधारावर फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेतो. कसे का होईना स्वतःला आलेल्या प्रसंगातून तारून नेतो. कारण खरोखरच लहानपणापासून मिळालेले संस्कारांचे बाळकडूच आपल्याला योग्य रस्ता दाखवते व पुनश्च उभे राहायची ताकद देते. 


वीणा कुलकर्णी 🙏🙏

Comments

  1. आता लिखाण नियमित सुरू ठेव ....

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद 🙏

      Delete
  2. Khup chan lihiles. Asech lihit raha.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अभंगाचा गाथा १३

झिम्मा

अभंगाचा गाथा १२