चांगुलपणा...
माझ्या मुलीने OTT Platform चा एक अजब खजिनाच जणू काही माझ्या समोर उघडून दिला आहे.
Sony liv वर हर्षद मेहता स्कॅम वर आधारित मालिका बघण्यात आली.हा स्कॅम ज्यांनी शोधला त्या सुचेता दलाल आणि देबाशिष बासू यांच्याच पुस्तकावर आधारित ही मालिका असल्यामुळे खरेखोटेपणा बद्दल दुमत नसावे.
मालिका जशीजशी पुढे सरकते तसेतसे हर्षद मेहता हा माणूस गुन्हेगार न वाटता , system चा बळी वाटू लागतो. कारण तो जर गुन्हेगार तर त्याला साथ देणारे बॅंक अधिकारी व त्याच्या कंपनीत पैसे गुंतवणारेही तेवढेच दोषी वाटू लागतात.
असो. आजचा विषय हा नाहीतर एकंदर सगळीकडेच सध्या खोटेपणाचा विजय होताना दिसतोय हा आहे.
चांगुलपणा हरत आहे का ???
खरोखर कलियुग अंतिम चरणात आले आहे का ?
कारण सध्या आजूबाजूला बघितले तर चांगुलपणाला किंमत उरली नाहीये असे दिसते.चांगल्या माणसांचेच वाईट होताना दिसत आहे. खरेपणाला कोणीही विचारताना दिसत नाही.
माझ्या मुलीने Good place नावाची मालिका Netflix वर बघितली. त्यात असे दाखवले आहे की God particles चा स्पर्श झाला की वाईट माणसेही चांगले वागू लागतात.
सध्या Good place (स्वर्ग) मध्ये जाणारी माणसे खूप कमी झाली असावीत का??? कारण त्यामुळे पृथ्वीवर God particles कमी येत आहेत त्यामुळेच वाईटपणाचा, हव्यासाचा सुळसुळाट सगळीकडे झाला आहे कां ??
पण ज्याअर्थी जग दुनिया अजूनही नीट तगून आहे, त्याअर्थी चांगल्या-वाईटाचा Balance टिकून आहे. चांगले लोक अबोलपणे, उगाचच गाजावाजा न करता आपले काम चोख बजावत आहेत. आणि त्याच मुळे जग तरून जायला मदत होत आहे.
'यदा यदाहि धर्मस्य' ह्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे तो जगन्नीयंता 'चांगुलपणा' च्या रूपात पुन्हा पुन्हा जन्म घेत आहे व जगाला तारून नेत आहे.
वीणा कुलकर्णी 🙏
Comments
Post a Comment