कुटुंब

     माझी एक मैत्रीण आहे. सेवानिवृत्त होऊन पाच सहा वर्ष झाली. सहजच कधीही फोन करा, ती बिझीच असते. खरेतर मला त्या गोष्टीचा कधीकधी हेवाही वाटतो.

     पण कधी तिची कीवही येते. कारण ती म्हणते, माझा संसार झाला, आता मुलाचा करत आहे.

    कारण आम्ही नोकरीला जात होतो, तेव्हा सकाळी आठची मालाडलोकल पकडत असू. त्यामुळे डबे, घरचे सगळेच आवरण्यासाठी सकाळी पाच ला उठणे अपरिहार्यच होते. नंतर संध्याकाळी ही जेवण, मुलांचा अभ्यास, इतर कामे आलीच. शनिवार, रविवार बाकी पसारा आवरण्यात जात असे. एकंदर बिझी असे दिवस होते. वय होते, उमेद होती, मजा वाटत होती सगळे करण्यात!!!! 

     पण आता तिचा दिवस अजूनही सकाळी पाचला च सुरू होतो. मुलाचा, सुनेचा डबा बनवण्यात मदत करण्यासाठी !! नंतर दिवस जातो नातवंडाचे करण्यात  !! 

    ती म्हणते निवृत्ती मिळलीच नाहीये.

    एकंदर काय एक पुती रडते आणि सात पुतीही रडते. कारण माझा मुलगा ऑस्ट्रेलियात असल्याने मी तशी बिझी नाहीये. घरातली थोडीफार कामे केली की दिवस तसा रिकामाच असतो. अर्थात घरातली कामे, वाचन,  OTT, भाजीपाला आणणे यात वेळ जातोच पण कुठेतरी मुलाबाळांची, नातवंडाची कमतरता जाणवते.

    आपण आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी त्यांना लांब ठेवतो. त्यांचा उत्कर्ष हेच आपले स्वप्न असते ते पुरे करतो. पण दिवसेंदिवस म्हातारपणी एकटे पडत जाणाऱ्या आपल्याला आधाराची गरज वाटू शकते हे ही तितकेच खरे आहे.

    पूर्वी एकत्र कुटुंब पध्दती होती त्यात लोकं नाराज होते आता विभक्त  कुटुंब पध्दतीत ही म्हणावी तशी खूश नाहीत. 


      नेमके काय हवे आहे आपल्याला?


   वीणा कुलकर्णी  🙏🙏

Comments

Popular posts from this blog

अभंगाचा गाथा १३

झिम्मा

अभंगाचा गाथा १२