नकार

     माझा एक सहकारी होता. तो मला नेहमी सांगायचा की 'नाही' म्हणायला शिका. 

     आम्ही public service देण्याच्या ठिकाणी काम करत होतो. Users आपली गाऱ्हाणी, मागण्या  घेऊन येत असत. सगळ्यांच्या सगळ्याच मागण्या पूर्ण करणे शक्‍यच नसे. त्यामुळे त्याचे सांगणे पटण्यासारखेच होते पण नाही म्हणणे मला कठीण जात असे.

     आता विचार केल्यावर पटते की नाही म्हणणे कधी कधी खूप गरजेचे असते. जे न करून आपण आपल्यालाच त्रास करून घेतो.

      खरंतर लहानपणापासून आपल्याला नकारघंटाच तर वाजवायला शिकवलेले असते. सगळ्या लहान मोठ्या मुलांना हे करू नको, ते करू नकोस असेच शिकवले जाते. काय कर ते कुणीच सांगत नाही.

      कुठेतरी वाचले होते की म्हणून म्हणे आपल्याकडे शास्त्रज्ञ तयार होत नाहीत कारण जिज्ञासाच मारून टाकली जाते. ते असो.

     एवढी नकारघंटा वाजवायला शिकवूनही नाही म्हणणे आपल्याला कठीण जाते ते जातेच.

     एवढेच कशाला Election मध्येही आपण NATO वापरत नाही.

    बहुतेकांचा स्वभाव  जन्मतःच भिडस्त असतो. त्यामुळे मनाविरुद्ध का होईना 'हो' म्हटले जाते आणि मग मनाविरुद्धच कामे करावी लागतात. 

    खरेच इतके कठीण असते का नाही म्हणणे ?

    आता या प्रश्नाचे उत्तरही 'नाही' असेच नसणार.  


वीणा कुलकर्णी  🙏🙏

Comments

  1. कारण आपल्यावर तसे संस्कार नाहीत,आपण वेगळ्या संस्कारात वाढलो, भावनेची कदर करतो, मध्य गाठतो,अती स्पष्टवक्तेपणा जमत नाही

    ReplyDelete
  2. वसंत फडकेOctober 25, 2023 at 5:46 PM

    वेळीच 'नाही' म्हटलेच पाहीजे, पण आपल्याकडून नाही म्हणायची खूपच घाई झाली, अस होता कामा नये ......

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अभंगाचा गाथा १३

झिम्मा

अभंगाचा गाथा १२