कलाविश्व

       मराठी टीव्ही मालिकांचे कलाविश्व कोणत्या टप्प्यावर उभे आहे तेच कळत नाहीसे झाले आहे.

        एक जमाना होता , चित्रहार, गजरा, फक्त काही दिवसांतच संपणाऱ्या मराठी मालिका !! खूप छान दिवस होते ते ! सगळेच घरगुती, कौटुंबिक!! सर्वांनी एकत्र बसून पहावे असे.

        आता मात्र मराठी मालिकांचे विषय पूर्णपणे बदलेले आहेत. ते आता कोणते वळण घेणार आहेत तेच कळत नाहीये. 

         OTT platform बद्दल तर न बोललेलेच बरा ! सेन्सॉरशिप नसल्यामुळे बेबंदपणे वाटेल ते दाखवता येते. ते असो...

         मराठी मालिकां बद्दल बोलायचे म्हटले तर उदाहरणार्थ स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते ही मालिका !! यात तर सामुहिक बलात्कार,  छोट्या मुलीचे अपहरण इत्यादी दाखवून मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. 

       झी, कलर्स,  सोनी, स्टार प्रवाह इत्यादी लोकप्रिय चॅनेलस् वरती सगळीकडे हाच प्रकार सुरू आहे. सगळ्याच मालिका असंबद्धपणे, वास्तव सोडून चालू आहेत, त्या ही अगदी सगळे सदस्य घरात असतात तेव्हा prime time ला !!

        विवाहबाह्य संबंध, मारामारी, सुनेला छळणे, गुंडागर्दी, थोबाडीत मारणे, स्त्रियांचा अपमान हे सर्व इतके सर्रास झाले आहे की बघणे कठीण होऊन बसते.

      सगळेच हलक्या दर्जाचे, विकृत झाले आहे. चुकीच्या गोष्टींचे उदात्तीकरण चालू आहे. लिखाणाचा दर्जा खूपच खालावला आहे. 

    असो.

     ते सर्व न बघणे हे तर आपल्या हातात आहे नां !! मग तर झाले. हाच धडा मी शिकले आहे. 

      त्यापेक्षा OTT वरील Rocket Boys, Scam 1,2 इत्यादी मालिका नक्कीच बघण्यासारख्या आहेत. 

      तसेच स्टार प्रवाह वरील महाराष्ट्राची हास्य जत्रा मात्र अजूनही पात्रता टिकवून आहे. 


वीणा कुलकर्णी 🙏🙏

Comments

  1. वसंत गोविंद फडकेFebruary 25, 2024 at 1:12 PM

    अशा स्वरुपाचे कार्यक्रम बघणे थांबून TRP कमी होईल तो सुदिन....
    बाकी सध्या आपण थांबणे हेच आपल्या हाती ....

    ReplyDelete
  2. कलियुग आहे,आपल्या सारख्यानी तर मला वाटते टीव्ही बघणे बंदच केले आहे,काही काळापर्यंत बातम्या बघितल्या जायच्या पण त्याही आता बघण्यासारख्या आणि ऐकण्यासारख्या नसतात

    ReplyDelete
  3. हो, महाराष्ट्राची हास्य जत्रा तेवढी बघण्या सारखी, बाकी न पाहिलेलेच बरे , अगदी बातम्या सुध्दा...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

फिनिक्स

कौतुक

लोलक