कौतुक

         कौतुक हा शब्दच एवढा प्रेरणादायी आहे की ज्याचे कौतुक केले की त्याला किती छान वाटत असेल!!!

          Reality shows बघताना मला नेहेमीच एका गोष्टीचे खूप कौतुक वाटत असते ते Anchoring करणारे करत असलेले participants चे कौतुक!!

        भले ते scripted असते पण किती ते सुंदर प्रेरणादायक बोलत असतात.  Participants चे कौतुक करताना थकत नाहीत.

       Anchors प्रमाणे Judges चे ही कौतुक झाले पाहिजे त्यांच्या बोलण्याबद्दल!! 

      एकदा मनापासुन आठवून बघा की तुम्ही कधी कुणाचे मनापासून कौतुक केले आहे?? किती छान प्रसंग असतात नां ते !! आणि हे ही आठवा की कुणी तुमचे कौतुक केले आहे !!

     माझ्या काॅलेजच्या आवारे या वर्गमित्राची joint family आहे. तो, त्याची बायको, दोन मुलगे, दोन सुना, दोन नातू !!

      माझा दुसरा वर्गमित्र ह्या successful joint family चे कौतुक करत म्हणाला,की त्यांचे success, ते एकमेकांना देत असलेले श्रेय, मोठेपणा यात आहे. खरंच किती कौतुकास्पद ना !! 

       बहुतेक सगळ्या ऑफिसेस मध्ये Appraisal असते. त्याचा हेतू  कौतुकच असते !! त्या कौतुकामुळे अजून चांगले काम करण्याची स्फूर्ती सगळ्यांना मिळते.

       मग आजपासून ठरवूया, समोरच्याचे मनापासून कौतुक करायचे, स्वतःबद्दल न बोलता समोरच्याला मोठेपणा द्यायचा. 

      जमवूयाच मनापासून, आमच्या वर्गमैत्रिणी सारखे....खूप बिझी असून ही सगळ्यांचे कौतुक करणाऱ्या डाॅक्टर विद्या दिवाण सारखे !!!!



वीणा कुलकर्णी 🙏🙏

Comments

  1. धन्यवाद वीणा कौतुकाचे चार शब्दच आयुष्याचे चार दिवस आनंदाचे घेऊन जातात

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

फिनिक्स

लोलक