गुलाम

        राणी मुखर्जी व आमिर खानचा गुलाम चित्रपट आठवतोय ? तोच "आती क्या खंडाळा" वाला ?

        श्रीमंत, नाजुकशी राजकन्या चित्रपटाची हिराॅईन तर आवारा, गुंड नायक !! पण चित्रपटाच्या शेवटी ती त्याच्या प्रेमाला बळी पडतेच.

       अशा प्रकाराच्या कथानकाचा मोह भल्याभल्या दिग्दर्शकांना पडला अगदी शोमॅन राज कपूर ही या मोहातून सुटू शकला नव्हता. असो. 

       मुद्दा आहे तो अशा कथानकांचा समाजावर होणारा परिणाम!! कारण सिनेमा हे खूप प्रभावी माध्यम आहे. त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात समाजावर होत असतो.

      खरतर सिनेमाला समाजाचा आरसा म्हटले जाते. म्हणजेच समाजात जे घडते तेच सिनेमात दाखवले जाते. पण कधी कधी उलटेही घडत असतेच की !! 

      तू मेरी नही तो किसी की भी नही अश्या प्रकारच्या कथानकांमुळे झालेले ॲसिड ॲटॅकस् अंगावर काटा आणतात.  

      गुलाम चित्रपट आला त्या काळातलीच एक गोष्ट!! 

      अशीच एक उत्तम करिअर असणारी ,चांगल्या घरातली, MBBS करणारी मुलगी !! एका मवाली तरुणावर भाळली. देवळात वगैरे लग्न करून त्याच्या झोपडीत रहायला गेली. शेवटी मारहाण असह्य झाल्यावर, गरोदरपणी आईवडीलांकडे परत आली. एक आयुष्य उध्वस्त झाले होते पण पुढे ती डॉक्टर झाली व आयुष्य सावरले ती गोष्ट वेगळी !!!! 

     पण सिनेमा हे खूपच प्रभावी माध्यम आहे हेच यातून अधोरेखित होते. 


वीणा कुलकर्णी  🙏🙏

Comments

  1. Very true, प्रेमात आंधळे होणे म्हणजे काय, हे नंतर डोळ्यासमोर अंधार येतो तेव्हाच कळते पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते

    ReplyDelete
  2. सिनेमा हे प्रभावी साधन आहे, त्याचा दुरुपयोग जास्त होत असतो,त्याच प्रमाणे टीव्ही सीरियल सुद्धा असेच झाले आहे.एक उदाहरण आई कुठ काय करते.नाव किती छान आहे सुरवातीला आईच पात्र पण छान होते नंतर तिला सुद्धा डायरेक्टर ने दुसरं लग्न करण्यास भाग पाडले असो

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

फिनिक्स

कौतुक

लोलक