अभंगांचा गाथा

    समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथे माझी हरी वृत्ति राहो॥ आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथे माझे आर्त नको देवा ॥ ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी । तेथे दुश्र्चित झणी जडों देसी॥ तुका म्हणे त्याचें कळले आम्हां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत  ॥


    हे हरी तुमचे चरण व नजर विटेवर स्थिर आहे आणि तेथेच, हरी तुमच्या ठिकाणी माझी वृत्ती स्थिर राहो. देवा या शिवाय कोणत्याही मायेने भरलेल्या  पदार्थांत माझे मन जाऊ देऊ नकोस. हे देवा , ब्रह्मा इत्यादी उच्च पदांकडे मन जाऊ देऊ नकोस. कारण अशी पदे दुःखच देतात.

  

   तुकाराम महाराज म्हणतात,  जे जे कर्मधर्म नष्ट होणारे, नाशिवंत आहे त्याचा मूळ अर्थ आता कळला आहे. 


   बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय ॥ 🙏🙏


वीणा कुलकर्णी 🙏🙏

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

फिनिक्स

कौतुक

लोलक