वैदिक आश्रम व्यवस्था

    मी सध्या मेलबर्न, ऑस्ट्रेलियात आहे. माझे मत कदाचित चूक असू शकेल. पण माझ्या पाहण्यात असे आले आहे की, इथे लोक सेवानिवृत्त होत नसावेत. अगदी सत्तर वर्षांपासून पार अगदी ऐंशी -पंच्याऐंशी पर्यंत ची माणसे शिकतही आहेत आणि शिकवतही आहेत !! अर्थात मी हे शैक्षणिक क्षेत्राबद्दल बोलत आहे बाकी क्षेत्रांची मला माहिती नाही.

     या गोष्टीचे आपल्याकडे खूप कौतुक आहे पण कदाचित वानप्रस्थाश्रमात जगण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या मला हे कुठेतरी खटकते. (अर्थात मला विचारतेय कोण हा मुद्दा वेगळा !!)

    कमी लोकसंख्या हे एक महत्वाचे कारण असू शकेल कां?? पण या गोष्टींचा तरुण पिढीला मिळणाऱ्या संधींवरती नक्कीच परिणाम होत असणारच!! त्यामुळेच सरकारी अनुदानावर जगणारी (भरकटलेली?) तरुण पिढी वाढत असावी का? खरेतर इथे वयस्कर लोकांची सरकार उत्तम काळजी घेते. (त्यांनीच आयुष्यभर भरलेल्या टॅक्सच्या पैशातून ही का असेना) असेही वाचनात आले आहे. तरीही.....

    एवढा अभ्यास माझा नक्कीच नाही. वरवर दिसते तसे नसूही शकते. पण प्रकर्षाने हजारो वर्षांपासून चार आश्रमांचे महत्व जाणणारी वैदिक भारतीय संस्कृती फारच प्रार्थनीय वाटली. 🙏🙏

    भारतात बहुतांश क्षेत्रात सर्वसामान्यपणे माणसे साठ ते पासष्ट दरम्यान सेवानिवृत्त होतात. पुढील पिढीला संधी मिळण्याच्या दृष्टीने ही अती उत्तम व्यवस्था आहे.

     राजकारणा बद्दल न बोलणेच उत्तम पण माननीय मोदीजींचे त्या ही दिशेने प्रयत्न सुरू आहेतच.

    आपल्याकडील एक फार मोठे व्यक्तीमत्व, आदरणीय मिल्कमॅन डाॅ वर्गीस कुरीयन, यांच्याबद्दल एक गोष्ट वाचनात आली होती. (खरी की खोटी ??)

    एका ठराविक कालावधीनंतर ही ते आपले पद सोडण्यास सहजी तयार नव्हते, इत्यादी, इत्यादी....

   त्यामुळे एक गोष्ट लक्षात येते, योग्य मान मिळत असतानाच कुठलेही पद मग ते घरातील असो वा ऑफिसातील सोडणेच योग्य !!! योग्य तेथे योग्य तेवढेच मार्गदर्शन जरूर करावे, अर्थात ते स्वत:च्या फायद्यासाठी नक्कीच नसावे.

   स्वतःचा मान स्वतःच राखावा, हळूहळू पदाचा त्याग करावाच लागणार हे सत्य स्विकारणे केव्हाही उत्तम.  स्वतःसाठी आणि पुढच्या पिढ्यांसाठी ही !!!

   भारतीय वैदिक आश्रम व्यवस्थापनाचे  सर्व थरांवर आचरण होणे ही काळाची तसेच स्व उन्नतीची गरज असेल. 🙏🙏


वीणा कुलकर्णी 🙏

Comments

  1. सुंदर आणि प्रत्येकाने आचरणात आणले तर उत्तमच....वीणा....तू अशीच लिहीत रहा....ह्या बाजारू विकाऊ जगात किती लोक हे करू शकतील ह्याबाबत शंकाच आहे..पण स्वतः जरी सुरूवात केली तरी खूप होईल..🙏🏻

    ReplyDelete
    Replies
    1. छान काॅमेंट बद्दल धन्यवाद 🙏

      Delete
  2. Vasant Govind PhadkeMay 6, 2022 at 12:29 PM

    आपलं कर्तव्य पूर्ण झालं की तिथून बाहेर पडणं, (अगदी शब्दशः अर्थ नका घेऊ ) हे आवश्यकच आहेच, त्या दृष्टीने आपली वैदिक परंपरा खूपच योग्य आहे, अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत असणं योग्य, तरीही कार्यक्षेत्र बदललं तर नव्यांना संधी मिळू शकेल आणि नविन येणारेही चांगलं कदाचित अधिक चांगलं करतील की ...
    खूप चांगल्या विषयाला / विचाराला तितकीच चांगली सुरुवात केलीस ...
    खुपच छान ...

    ReplyDelete
  3. लोकांनी जा आता असं म्हणण्या पूर्वी सन्मानाने सेवानिवृत्त होणं केव्हाही चांगले, वीस एकवीस वर्षे शिक्षण, तीस पस्तीस वर्षे नोकरी/धंदा करूनही लोक जागा सोडत नाहीत, मग अनेक प्रश्न निर्माण होतात, हे कळतं पण वळत नाही ना...

    ReplyDelete
    Replies
    1. एकदम खरे आहे.
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

      Delete
  4. ऑस्ट्रेलिया आणि भारत यामध्ये सामाजिक दृष्ट्या तसेच भौगोलिक दृष्ट्या खूप अंतर आहे.ऑस्ट्रेलिया भौगोलिक दृष्ट्या
    आण्णासाहेब आवारेखूप मोठा देश असला तरी लोकसंख्या त्या मानाने खूप कमी आहे त्यामुळे तिथे तरुण लोकपेक्षा निवृत्त लोक जास्त आहे परंतु भारत हा तरुणांचा देश आहे त्यामुळे तरुणांना रोजगार मिळणे गरजेचे आहे इथे जर सेवानिवृत्त लोकांनी जागा अडवून ठेवल्यात तर तरुणांना काम मिळणार नाही याचा विचार करता भारत सरकारने 60 याऐवजी 58 सेवानिवृत्ती वय ठेवल्यास अजून तरुणांना काम मिळेल. उलटपक्षी ऑस्ट्रेलियात भरपूर शेती आहे पूरक व्यवसायात भरपूर वाव आहे परंतु तरुणांचा भरणा कमी असल्यामुळे सेवानिवृत्त लोकांना आरामात काम मिळते.आज आपल्याकडे D ed, B ed झालेले नोकऱ्या शोधत आहे असो दोन्ही देशांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत आणि त्या मुळे दोघांचे एकमेकाशी तुलना होऊ शकत नाही.पण वीणा विषय छान निवडला आणि. असाच एक नवीन विषय घेऊन परत ये वाट बघत आहोत नवीन विषयाची.सुरेख लेख.धन्यवाद ,

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अभंगाचा गाथा १३

झिम्मा

अभंगाचा गाथा १२