अनमोल!!

      तामिळनाडूतील कुंभकोणम जवळच्या शिवमंदिरात दहा पायऱ्या आहेत. ज्यातून सारेगमपधनी आणि ओमकार ध्वनी उमटतात. तसेच हंपी येथील विठ्ठल मंदिरात ही सारेगमप स्वर निर्माण करणारे खांब आहेत.

      अशा एकाहून एक अद्भुत वास्तू भारताभर पसरल्या आहेत.अतिशय अनमोल असा ठेवा भारतात आहे तेवढा अन्य कुठे सापडत नाही.

       पण दगडातून ही संगीत निर्माण करणाऱ्या भारत देशात आता त्याच अद्वितीय वास्तू , लोकांनी दगड मारून आवाज निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे , जाळीमध्ये बंदिस्त करून ठेवण्याची वेळ आली आहे.

       एकंदर विचार करता, त्या मानाने दक्षिण भारतातील अशी अनमोल स्थळे सुरक्षित राहिली कारण आपले शिवाजीमहाराज!! उत्तरेत पसरलेले मोंगली वादळ या राजाने मध्येच थोपवून ठेवले व दक्षिण भारत थोड्या  प्रमाणात का होईना विध्वंसा पासून वाचला.

      अशा अनमोल वास्तू आहेत त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहेच पण त्या आपल्यापासूनच सुरक्षित आहेत कां ? हा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो.

      आपल्या संस्कृतीतील सभ्यता कधी लोप पावली ?? 

      10-12 व्या शतकापर्यंत बहुदा सगळीकडे भरभराट, उन्नती होती. त्यानंतर घसरण सुरू झाली असावी. कारण 700 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर,  तुकारामादिंनी सोसलेल्या त्रासाबद्दल वाचले की आपल्या संस्कृतीबद्दल संशय येतो. 

आता तर नवीन फॅड आले आहे सेल्फीचे !! आधीच उल्हास त्यात......

आपण मात्र आपल्याकडून आपल्या संस्कृतीचे कसे जतन होईल याबद्दल जागरुक रहायचे व ते पाळायचे.

मात्र तेजस ट्रेन मधला विध्वंस कशाचे द्योतक आहे ? आपण कोणत्या मार्गावर आहोत ? 

शिक्षणपद्धतीत बदल करण्याची गरज आहे का ??


वीणा कुलकर्णी  🙏🙏


Comments

  1. वसंत फडकेSeptember 3, 2023 at 1:19 PM

    मुळात आपल्याकडील अशा अनेक आश्चर्यकारक निर्मितींबाबत आपण अनभिज्ञ आहोत, आपल्या शैक्षणिक जीवनातच याबाबत माहिती होणं आवश्यक आहे,त्यासाठी अर्थातच शिक्षण पद्धतीत बदल होणं गरजेच .....

    ReplyDelete
  2. आजकाल लोकामध्ये विध्वंसक वृत्ती वाढू लागली आहे. कदाचित शिक्षण पध्दतीमधील त्रूटीं मुळेच. समाजातील संयमशिलताही कमी होऊ लागली आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अभंगाचा गाथा १३

झिम्मा

अभंगाचा गाथा १२