अलक: (अती लघुकथा)
१. काकू: सकाळ उजाडली, काकू गेल्याच्या बातमीने अख्खे गाव गोळा झाले. शेवटच्या आंघोळी साठी मुलाने कळशी वरचे झाकण काढले मात्र, काकू काय झाले करत उठून बसल्या.
रात्री कळशी उघडी दिसली
म्हणून मुलानेच झाकण ठेवले होते आणि पाणी प्यायला गेलेला काकूंचा आत्मा त्यात
अडकला होता.
२. राजकन्या:
तलावाच्या काठावर बसलेला हिरवा जर्द बेडूक, राजकन्ये ला येताना पाहून खुशीत हसला, आता प्रेमाच्या एका चुंबनाचीच प्रतिक्षा होती.
ती आली ,तिने अलगद त्याला उचलून घरी नेले. आणि दासीच्या
हातात देऊन म्हणाली,याच्या मांड्यां
ची मस्त भाजी कर.
३. कुतुबमिनार: समीर
आणि त्याच्या मित्रांनी रात्रीच्या अंधारात गुपचुप खूप काळजीपूर्वक कुतुबमिनार
वाटोळे बॉम्ब पेरले.
सकाळीच अपेक्षित परिणाम
दिसून आला.
श्री विष्णुदेव अलगद
जमीनीवर पहुडले होते आणि नाभीतून बाहेर आलेला कुतुबमिनार कमल दिठीसारखा डौलात डुलत
होता.
वीणा कुलकर्णी 🙏
Comments
Post a Comment