तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!!!
कुणा एका शिल्पकाराने म्हटलंय की, मूर्ती आत असतेच, आम्ही फक्त वरचा जास्तीचा दगड काढून टाकतो.
आपले सद्गुरू वामनराव पै म्हणतात, 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ' !!!!
म्हणजे थोडक्यात काय तर आपणच आपले जीवन चांगले घडवायचे असते. स्वतःच स्वतःला चांगल्या मार्गावर ठेवायचे असते.
मालाड पश्चिमेला स. वामनराव पै चौकात एक पुतळा आहे, त्याचा फोटो खाली देत आहेच.
त्यात एक माणूस स्वतःच स्वतःला तासून घडवत आहे.
आपणच स्वतःला घडवायचे असते. चांगले-वाईट वागणे आपल्याच हातात असते. नीर-क्षीर विवेकेषु आपणच योग्य निर्णय घ्यायचे असतात. अर्थात ते नेहमीच साध्य होते असे नाही पण प्रयत्न करत रहायचे.
पाश्चिमात्य देशात एक संकल्पना आहे.
मायकेल एंजेलो इफेक्ट!!!
त्यात म्हटले आहे की, तुमचा सोबती,तुमचे जवळचे लोक तुमचे व्यक्तिमत्त्व घडवत असतात.
तुमच्या पार्टनर च्या तुमच्या बरोबर बोलण्याचा, वागणूकीचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडत असतो.
त्यामुळे आपल्या आजूबाजूची माणसे, मित्रमंडळ चांगले निवडावे.
कोण,कुठे तुम्हाला चुकीच्या रस्त्याला नेत असेल, भरकटवत असेल तर वेळीच सावध व्हावे व स्वतःला सावरावे.
कारण शेवटी आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो.
वीणा कुलकर्णी 🙏🙏

अगदी खरं आहे, पटतं पण वळत नाही..
ReplyDelete