Posts

Showing posts with the label science

अलीबाबाची गुहा..

   टीव्हीवरील निरर्थक मालिकांना कंटाळून का होईना मी अचानक युट्यूब कडे वळले.   म्हणजे तसे स्मिता ओक,मधुरा रेसिपी, विष्णू मनोहर, Bristi home, Hebbars Kitchen, IamBhagyashri इत्यादींच्या रेसिपीज बघून घरच्यांवर प्रयोग करत होतेच पण युट्यूब 'ऐकत' नव्हते.    आणि मग मला अलीबाबाची गुहा उघडावी तसा एक खूप सुंदर खजिना गवसला. आणि नंतर मी युट्यूब वरच्या मुलाखतींमध्ये अक्षरशः गुंगून गेले. किती ऐकू आणि किती नको असे होऊन गेले.     प्राध्यापक प्र.के. घाणेकर अत्यंत बहुआयामि व्यक्तिमत्त्व!!! गड, किल्ले,  मंदिरे, मूर्ती, वनस्पती इत्यादी,इत्यादी ...किती ऐकावे तेवढे थोडेच.    'घातसूत्र ' कार दीपक करंजीकर (@deepakkaranjikar) यांची व्याख्याने तर थक्क करून टाकतात. त्यांनी केलेले संशोधन, विश्लेषण ऐकताना आपण अक्षरशः मंत्रमुग्ध होतो.       तसेच निलेश ओक (@nileshoak5561) यांचे...त्यांचे महाभारत,  रामायणा वरील संशोधन असेच थक्क करणारे. अनेक गोष्टींचा शोध लागल्याचा आनंद मिळतो. तीच गोष्ट प्रवीण मोहन यांच्या व्हिडिओंची.      कि...