OTT मायाजाल
आमचे एक ओरिसाचे मित्रवर्य एकदा म्हणाले, मराठी व बंगालीला खूपच मोठी सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे पण सिनेमाबद्दल म्हणाल तर दोन्हीकडे दु:खच विकतात... दु:ख तर काय जीवनाचे एक अविभाज्य अंगच आहे, ते कुणाला टळलेय ??? पण सिनेमात तरी इंटरटेनमेंट दाखवा की ! तीन तास तरी जरा स्वप्नात जगा !!!
हे बरेचसे पटलेच. मग मनापासून वाटले की कशाला विकतचे दु:ख घ्या.
मुळात इंग्लिश सिनेमांची आवड होतीच. Schindler’s
List, Sound of Music पासून Avengers
चा परत परत आनंद घेवून नवनवीन उत्तम जागा
शोधण्यात मजा येत असे.
OTT platform पासून मात्र थोडी दूरच होते, ते 'मायाजाल' वाटत असे. पण एकदा मात्र
मुलीच्या आग्रहाखातर या मोहजालात गुरफटले आणि त्या आनंदसागरात पुन्हा पुन्हा डुंबत
राहिले.
अलीबाबाची गुहा की
पद्मनाभ मंदिराचा सातवा दरवाजाच उघडला.
सुरवात झाली फॅमिली मॅन
पासून. एवढी उच्च दर्जेदार कलाकृतीने पुढे पुढे पाहण्यास बांधून ठेवले. तिसरा भाग
लवकरच येत आहे म्हणे, ही आनंदाची बातमी
!!
'असुर ' ही Hollywood ला टक्कर देणारी! सरसरून काटा आणणारी पण मनाच्या एका
काळ्या कोपर्यात पटणारीही... दुसऱ्या
भागाची उत्कंठेने वाट पहात आहे,कारण लवकरच येत
आहे असे वाचनात आले.
खरतर आपल्या ओळखीच्याच TV
पासून सुरुवात करू... 'पुनश्च हरिओम' निखळ, नितळ आनंद देणारा,
मनापासून बनवलेला साधा, सोपा सिनेमा, कितीही वेळा नव्याने बघावा !
तसाच AB & CD, lockdown आधी दोनच महिने थिएटर मध्ये दाखवलेला नंतर OTT
वर आलेला, वेगळाच छानसा.
नंतर मात्र
Lockdown मुळे OTT शिवाय पर्याय च नव्हता... वेळ घालवण्यासाठी असे आधी वाटले पण मग काही कलाकृती इतक्या
दर्जेदार की त्यांनी कोरोना च्या काळ्या काळाचा थोडा विसर पाडला.
यात सगळ्यांत वर नंबर
लागतो, Netflix च्या Death
of 2020 आणि Death of
2021चा !!
विनोदाची पखरण पुनः पुनः
आनंद घ्यावी अशी. कटू कठोर सत्य इतक्या मोकळ्या पध्दतीत मांडलेले पहिल्यांदाच
पाहिले. कोरोना, लस, त्याचे राजकारण यावर परखड पण विनोदी शैलीत
याहून अप्रतिम काही असूच शकत नाही.
तसाच त्यांचा Don't
Look Up movie, केवळ लाजवाब!! अमेरिकेतील
लोकशाहीचा प्रत्यंतर या movie तून दिसतो. न
घाबरता, मिस्कीलपणे, नेते, मिडीया, सोसायटी या सगळ्यांच्याच
व्यंगावर केलेले खुसखुशीत विनोदी चित्रण, अप्रतिम!!!!
'Lupin' वर तर कित्ती लिहावे.... इतका गोड चोर तुमचे
मनही चोरतो.
Lucifer सारख्या वेगळ्याच
धाटणीची उत्तम series मात्र वेळेत बंद
करून लोकप्रियता टिकवली.
सुहास शिरवळकरांच्या कादंबरीवर आलेली 'समांतर ' MX Player ने प्रदर्शित केली. TV वरचे दोन लोकप्रिय कृष्ण वेगळ्याच भूमिकेत दिसले... पहिलाच भाग प्रेक्षणीय !
Amazon Prime वर आलेली एक अत्यंत सुंदर मालिका must
watch सदरात मोडणारी... पंचायत, एवढी अप्रतिम, साधी सरळ आपल्याच
मातीतील कथा, सगळ्यांच्याच सहज सुंदर
अभिनयाने खुललेली !!!!! दुसरा भाग लवकरच येत आहे ही आनंदाची बातमी...
जापनीज series ची एक वेगळीच मजा आहे. राजकारणी ही कठीण प्रसंगात ठरवले तर
किती उत्तम मार्ग काढू शकतात हे सांगणारी,
खुर्चीला खिळवून ठेवणारी Japan
Sinks: People of Hope. खराखुरा अभिनय,
खरेच होणार की काय अशा पध्दतीची उत्कंठावर्धक
कथा...
त्यामुळेच जपान विषयी खूपच आदर वाटत असताना 2017 ची CRISIS: Special Security Squad पाहण्यात येते आणि राजकारणी सगळीकडे सारखेच यावर
शिक्कामोर्तब होते 😀
जपानी series ची एक गोष्ट वाखाणण्यासारखी... त्या जपानी भाषेतच असतात,
English subtitles मध्येच आपल्याला त्या
पहाव्या लागतात.
Benedict Cumberbatch
चा Courier सारखा उत्तम movie कसा विसरून चालेल...
असो त्याबद्दल नंतर
केव्हातरी !!!!!
कुणाचा गैरसमज नक्कीच होऊ
शकतो... या retired बाईला कसले आलेय
काम ? तर तसे अजिबातच
नाही!...दिवसातले फक्त दोनच तास खूप होतात... कारण बाकी TV वर खरोखर काय बघावे हा एक स्वतंत्र संशोधनाचाच विषय ठरेल 😀
पण तुमच्या रिस्पॉन्स ने
हुरूप नक्कीच येतो... लिहीते राहण्यासाठी... त्यामुळे वरील एकएक सिरियल घेऊन त्यावर
लिहीणे आवडेल.
वीणा कुलकर्णी 🙏
छान लिहिलंय,मालिका टीव्ही वगैरे पेक्षा लिहीन खूप छान,आपले विचार प्रगट होत असतात आणि मनातलं कुणाला तरी सांगावस वाटत ती पण इच्छा पूर्ण होते🙏🙏🙏💐💐🚩
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteवा, OTT वरची बरीच चांगली माहिती..
ReplyDelete