चांगुलपणा...
माझ्या मुलीने OTT Platform चा एक अजब खजिनाच जणू काही माझ्या समोर उघडून दिला आहे. Sony liv वर हर्षद मेहता स्कॅम वर आधारित मालिका बघण्यात आली.हा स्कॅम ज्यांनी शोधला त्या सुचेता दलाल आणि देबाशिष बासू यांच्याच पुस्तकावर आधारित ही मालिका असल्यामुळे खरेखोटेपणा बद्दल दुमत नसावे. मालिका जशीजशी पुढे सरकते तसेतसे हर्षद मेहता हा माणूस गुन्हेगार न वाटता , system चा बळी वाटू लागतो. कारण तो जर गुन्हेगार तर त्याला साथ देणारे बॅंक अधिकारी व त्याच्या कंपनीत पैसे गुंतवणारेही तेवढेच दोषी वाटू लागतात. असो. आजचा विषय हा नाहीतर एकंदर सगळीकडेच सध्या खोटेपणाचा विजय होताना दिसतोय हा आहे. चांगुलपणा हरत आहे का ??? खरोखर कलियुग अंतिम चरणात आले आहे का ? कारण सध्या आजूबाजूला बघितले तर चांगुलपणाला किंमत उरली नाहीये असे दिसते.चांगल्या माणसांचेच वाईट होताना दिसत आहे. खरेपणाला कोणीही विचारताना दिसत नाही. माझ्या मुलीने Good place नावा...