Posts

Showing posts from March, 2026

गीता वचन

    श्रद्धेचा आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम या विषयावर एक क्लीप ऐकण्यात आली.      त्यात असे म्हटले आहे की, श्रद्धेने तुम्ही मेडीटेशन करत असाल तर त्याचा खूपच सकारात्मक परिणाम तुमच्या मनावर, तब्येतीवर होतो.     मेडीटेशन करत असताना चांगल्या विचारांचे, तब्येत ठीक होण्याचे असे काही ठोस ध्येय समोर ठेवून जर तुम्ही मनाची शक्ती वाढवलीत तर तुमचे आरोग्य, मन चांगले रहाते, सुधारते.     त्यासाठी त्या क्लीप मध्ये गीतेच्या  १५  व्या अध्यायातील  ५  व्या श्लोकाचे उच्चारण केले आहे. तुम्ही मनाला  पंचेंद्रियांना जिंकून घेवू शकता इतकी शक्ती मेडीटेशन मध्ये आहे.     गीता अध्याय  १५  श्लोक  ५  वा :  "ज्यांचा मान आणि मोह नष्ट झाला आहे,ज्यांनी आसक्तीरूपी दोष जिंकला आहे, जे नित्य परमात्म्याच्या स्वरूपात स्थित आहेत, ज्यांच्या कामना पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत आणि जे सुख-दुःख नामक द्वंद्वापासून मुक्त आहेत, असे ज्ञानी पुरूष त्या अविनाशी परमपदाला प्राप्त होतात." रामकृष्ण हरी 🙏 वीणा कुलकर्णी 🙏🙏

कलीयुगाची पूर्वसूचना

    सध्या सगळीकडेच युध्दाच्या बातम्या ऐकू येत आहेत.त्या संदर्भात एक गोष्ट आठवली.      महाभारत युध्द समाप्ती नंतर कलीयुगाची सुरवात होणार असते. कली लोकांच्या डोक्यात शिरून विध्वंसाची सुरुवात करणार असतो. त्या पार्श्वभूमीवर पांडवानी भगवान श्रीकृष्णांना विचारले कलीयुगात कशी परिस्थिती असेल यावर भगवानानी चार दिशांना चार बाण फेकले व ते त्यांना आणावयास सांगितले.        अर्जुन ज्या दिशेला पोचला तेथे जे दृश्य दिसले त्याने तो थक्क झाला. एक मैना मंजुळ आवाजात गात होती. पण गाता गाता ती एका जिवंत सशाचे लचके तोडून खात होती.      भीमाने ही आपल्या दिशेला पोचल्यावर जे पाहिले ते ही थक्क करणारे होते. चार पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरींच्या मध्ये एक विहीर होती,ती मात्र कोरडी ठाक होती.      नकुलाला असे दिसले की, एक गाय आपल्या नुकत्याच जन्म दिलेल्या वासराला चाटत होती पण तीने त्याला इतके चाटले की त्याची कातडी सोलवटली. शेवटी लोकांनी त्याला तिच्यापासून दूर केले.      सहदेवाला एक मोठा दगड डोंगरावरून गडगडत येताना दिसला. तो वाट...

अशीच एक गोष्ट

    ती सुंदर राजकन्या आणि बेडूक झालेल्या शापित राजपुत्राची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. माझी गोष्ट थोडी वेगळीच आहे. छान, गंमतशीर अजिबात नाहीये.      तर आपली ही नवीन राजकन्या अशीच फेरफटका मारत बागेत फिरत असते. तेवढ्यात तिला एक चांगला जाडा,काळपट हिरवा बेडूक तलावाकाठी बसलेला दिसतो. ती त्याच्याकडे जाऊ लागते......      तिला जवळ येताना बघून तो मनोमन खूप खुश होतो.....    आता ती येणार,आपल्याला उचलणार आणि आपले तिच्या सुंदर  ओठांनी चुंबन घेताच आपण शापमुक्त होऊ आणि नंतर तिच्याजवळ विवाह करून आपल्या राज्यात राज्य करू....      ती येते,त्याला उचलते आणि स्वतःजवळच्या पिशवीत ठेवते. मग ती घरी येते त्या बेडकाला स्वच्छ धुते, निगुतीने सगळीकडून त्याला छान कापते व त्याच्या मांड्यांचा चमचमीत रस्सा करून चाटून पुसून खाते....    संपली गोष्ट....     मलाही लिहीताना खूप वाईट वाटले पण साधारण पस्तीस चाळीस वर्षांपूर्वी हा व्यवसाय खूप भरभराटीला आला होता. आताही असेल तर मला माहीत नाही.      बेडकांच्या मांड्या चीनला...