|| मना सज्जना ||

      रामदास स्वामींनी ज्या मनाला 'सज्जना' संबोधून श्लोक लिहीले आहेत ते मन किती विचित्र, अचपळ असते याचा आपल्या सगळ्यांना चांगलाच अनुभव आहे.

       परवा माझ्या मैत्रीणीने, सुरेखाने, सौ धनश्री लेले यांचा एक सुंदर व्हिडिओ पाठवला. त्यात त्यांनी यक्षाने धर्मराजाला विचारलेल्या प्रश्नाबद्दल सांगितले की 'काय आवरले तर शोक करावा लागत नाही?' यावर धर्मराजाने तात्काळ 'मन' हे उत्तर दिले.

    पण मनाला आवरणे खरच इतके सोपे आहे का ??? माझ्या मते सर्वांचे उत्तर 'शक्यच नाही' हेच असणार. कारण  मन सतत इकडे तिकडे धावत असते,विचार करत असते. शांत बसला असाल तर अशांत करते.सतत चांगले-वाईट काही ना काही ज्याच्या डोक्यात भिरभिरत असते ते 'मन'!!

       कुठेतरी वाचले होते ,की श्री दत्तगुरू म्हणजे ब्रम्हा,विष्णू,महेश !!

Creator, Preserver, Destroyer: Body, Brain, Emotions!!

    ब्रम्हा म्हणजे सरस्वतीचे वरदान म्हणजे अभ्यास, हा physically, Body ला करावा लागतो.

     विष्णू म्हणजे Brain /मन. मन चांगले असेल तर बुध्दी ही चांगले विचार करते.

     महेश Destroyer म्हणजे Emotions, ज्यामुळेच अनेक प्रश्न निर्माण होतात जे मनाला बिघडवतात.

       Emotions म्हणजे मनाचा खेळ!! मनाला भूतकाळातल्या वाईटसाईट, दुःखद नकारात्मक गोष्टींतच रमायला आवडते. नाहीतर ते भविष्यातल्या  कदाचित घडतील किंवा नाहीही अशा घटनांच्या चिंतेत असते. आणि ह्या सगळ्यात वर्तमानाचा मात्र विस्कोट करून टाकते. 

     अर्थात हे सगळ्यांच्याच बाबतीत घडत असेल असेही नाही पण एकंदर मनाच्या चंचलते बद्द्ल लिहीले आहे.

    तसे बघता मनाच्या चंचलतेला आवर घालणे,  प्रयत्नपूर्वक आपल्याही हातात असतेच की !!!

सकारात्मक विचार, Guided Meditation,  छंदामध्ये रमणे इत्यांदी हे उपाय नक्कीच प्रभावशाली आहेत. नातवंडे घरात असतील तर तुमच्यासारखे सुखी तुम्हीच!!

    असो ! मनाची भिरभिर खूप झाली. त्याला शांत करण्याची वेळ आली आहे......अर्धा कप चहा पिऊन 😀


   वीणा कुलकर्णी  🙏 

Comments

  1. वसंत फडकेAugust 13, 2023 at 1:18 PM

    खरंच मनाला आवरता आलं तर जगणं खूप सोप आणि सहज होईल ना ....

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद 🙏

      Delete
  2. खूप छान '' मनाबद्दल मनोगत मस्त

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद 🙏

      Delete
  3. Mast. Vachun chan vatale.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद 🙏

      Delete
  4. Mast. Vachun chan vatale.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद 🙏

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

अभंगाचा गाथा १३

झिम्मा

अभंगाचा गाथा १२