जीवन

    आज सकाळीच माझा मूड ठीक केला आमच्या दूधवाल्याने !! अर्थात रोजच तो गाणे गुणगुणत सगळ्यांच्या दुधाच्या पिशव्या देत असतो.पण आज मला ते प्रकर्षाने जाणवले व त्याने मूड ठीक केला.

     जीवनात आलेले वाईट प्रसंग त्यानंतर पुन्हा आलेले चांगले दिवस या चक्रात कधीकधी त्या झाकोळातून मन बाहेर येऊ देत नाही. कधी खूप उदास वाटत रहाते अशावेळेस असा दूधवालाही नवीन उमेद देऊन जातो.

      पण खरे बघायला गेल्यास दिसते तसे नसते. बहुतेक माणसे मुखवटा घालूनच फिरत असतात. वरवर सगळे ठीकठाक दिसले तरी आतील खळबळ मुखवट्या आडच रहाते, जगापासून लपूनच !! अर्थात हा मानवी स्वभावच आहे. सुख जगासोबत वाटले जाते तर दुःख मात्र  लपवून ठेवले जाते किंवा भारीतभारी एकदम जवळच्याच माणसांसमोरच ते मोकळे केले जाते.

      पण आज सकाळी मला दूधवाल्याचे खूपच कौतुक वाटले. त्याला नसतील का विवंचना, दुःखे ?? पगार तो कितीसा, मेहनत ही खूप तरीही तो आहे त्या परिस्थितीत गाणे गुणगुणत आनंदात रहात आहे.

     खरोखर जीवनात आलेले वाईट प्रसंग, दुःखद घटना विसरून नव्या उमेदीने जगणे शिकवणारा दूधवाला माझा आजचा गुरू !!! 

     श्री दत्तगुरूंनी जसे चौवीस गुरू केले तसे नवीन उमेद जागवणारे अनेक गुरू जीवनात भेटोत व जीवन सुंदर व आनंदी होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !! 🙏🙏



वीणा कुलकर्णी  🙏🙏

Comments

  1. Chan. Ashach chotya chotya gosti madhun Anand milavayacha asto. Yalach tar Jeevan mhantat. Asech lihit raha.

    ReplyDelete
  2. फक्त गुणगुणणे नव्हे तर शीळ घालण्यानेही तणाव, दुःख दूर होऊ शकते. शीळ घालण्यायत so called असभ्यता अजिबात नहीं. गुणगुणणे, शीळ घालणे यांमुळे वातावरण आनंदी राहते. डोक्यावरचा तणाव, चिंता, अडचणी काही काळासाठी दूर होऊन एकदम हलके, ताजेतवाने वाटते.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अभंगाचा गाथा १३

झिम्मा

अभंगाचा गाथा १२