सिंहावलोकन

     इंग्रजी नवीन  वर्ष सुरू होऊन एक आठवडा उलटलाही !! 

     whatsapp ला कुठून कुठून whatsapp University knowledge असे हिणवले गेले आहे पण मला तरी ते वेळ जाण्याचे उत्तम साधन वाटते व खूप वेळा चांगली माहितीही मिळून जाते.

     अश्याच एका whatsapp video मध्ये सिंहावलोकन शब्दा बद्दल सांगितले गेले की सिंह जेव्हा relax mood मध्ये असतो, म्हणजे शिकार करत नसतो ,तेव्हा जर चालत असेल, तर दर दहा पावले चालतो आणि मग मागे वळून पहातो, याला सिंहावलोकन म्हणतात. 

      खरंतर  नवीन वर्ष सुरू झाले म्हणून हा शब्द आठवला. खरतर सिंहासारखे दर दहा दिवसांनी सिंहावलोकन करणे जरूरी आहे. मात्र ते न करता आपण चालतच रहातो व केलेल्या चुकांची पुनरावृत्ती करतच रहातो. 

       हे अर्थातच मी माझ्याबद्दल लिहीत आहे. बरेचसे लोक आधी केलेल्या चुकांकडून खूप काही शिकतात व जाणीवपूर्वक त्या टाळण्याची खबरदारी घेतात.

      नवीन वर्ष सुरू झाले की अनेक जण नवनवीन resolutions करतात. त्यापैकी किती प्रत्यक्षात उतरतात हा मुद्दा अलाहिदा ! असो ! 

       मला मात्र सिंहावलोकन हा छान शब्द गवसला व त्याचा अर्थही खूप सुंदर वाटला. आणि मी मनापासून ठरवले आहे की दर दहा दिवसांनी सिंहावलोकन करायचे आणि झालेल्या चुका जाणीवपूर्वक टाळण्याचा मनापासून प्रयत्न करायचा.

     बघुया किती प्रत्यक्षात उतरते ते !!



वीणा कुलकर्णी  🙏🙏

Comments

  1. वसंत फडकेJanuary 9, 2024 at 5:51 PM

    खरंच आवश्यक आहे असं सिंहावलोकन...

    ReplyDelete
  2. Swati Rane .yogyach ahe.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अभंगाचा गाथा १३

झिम्मा

अभंगाचा गाथा १२