अभंगांचा गाथा

    मी देहूरोड या जागी नियुक्तीला होते तेव्हा देहू या पवित्र ठिकाणी येणेजाणे होत असे.

    जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा गाथा तेथेच माझ्या हाती आला. त्यातीलच काही अभंग मला समजले तसे........

   सुंदर ते ध्यान उभे विटेवरी | कर  कटावरी ठेवूनिया ॥ तुळसीचे हार गळां कासे पितांबर | आवडे निरंतर तें चि रूप ॥ मकरकुंडले तळपती श्रवणी | कंठी कौस्तुभमणि विराजित ॥ तुका म्हणे माझे हें चि सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीने ॥ 

   सुंदर असे ते विठ्ठलाचे रूप विटेवर उभे आहे, ज्याने कमरेवर हात ठेवले आहेत. गळ्यात तुळशीचे हार आहेत आणि कमरेला पितांबर नेसले आहे, असे ते सुंदर रूप कायमच आवडणारे आहे. गोलाकार व नक्षीदार अशी मकरकुंडले कानात शोभत आहेत व गळ्यात पवित्र असा कौस्तुभ मणि रूळत आहे. असे हे विठ्ठलाचे मनोहारी सुंदर मुख आवडीने पहाणे ह्यातच माझे सर्व सुख आहे. 

    

  असे श्री तुकाराम महाराज म्हणतात, तसेच आपणही म्हणूया. 

बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय ॥ 🙏🙏



वीणा कुलकर्णी 🙏🙏

Comments

  1. खूपच सुंदर आणि भक्ती भाव जागवतो अभंगाच निरूपण तुम्ही छान केलंत.राम कृष्ण हरी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

फिनिक्स

कौतुक

लोलक