अभंगांचा गाथा
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया | गोड तुझे रूप गोड तुझे नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राही ह्रदयामाजी ॥ तुका म्हणे कांही न मागे आणीक। तुझे पायीं सुख सर्व आहे ॥
रखुमाईचा पती असलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे माझे डोळे कायम बघत राहोत. विठ्ठला , तुझे रूप, नाम सर्वच खूप गोड आहे , तुझे प्रेम मला सदा सर्वकाळ मिळत राहू दे. विठ्ठला, मायबापा, तूच माझ्या ह्रदयात निरंतर रहावास असा मला वर दे.
तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला, तुझ्या पायाशीच माझे सर्व सुख आहे आणि याहून अधिक काहीही माझे मागणे नाही.
बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल , श्री ज्ञानदेव तुकाराम , पंढरीनाथ महाराज की जय ॥ 🙏🙏
वीणा कुलकर्णी 🙏🙏
राम कृष्ण हरी
ReplyDelete