अभंगाचा गाथा ५

    नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाहीं देवें ॥ नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येईल तैसा बोल रामकृष्ण ॥ देवापाशीं मागें आवडीची भक्ति । विश्वासेंशीं प्रीति भावबळें ॥ तुका म्हणे मना सांगतों विचार । धरावा निर्धार दिसेंदिस ॥


    देवाने मला मधुर गळा, गोड स्वर दिला नाही. पण मला ठाऊक आहे की देव त्याचा भुकेला नाही. जसा येईल तसा भक्तीभावे रामकृष्ण हा मंत्र जपायचा आहे. देवाची विश्वासाने, प्रेमाने,आवडीने भक्ती करायची आहे. 

    तुकाराम महाराज म्हणतात,  हे मना तुला मी सांगतो, की विठ्ठला विषयी तू दिवसेंदिवस दृढ निर्धार धर. 


बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल,

श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय ॥



वीणा कुलकर्णी 🙏🙏

Comments

  1. खूपच सुंदर निरूपण केलंय अभंगाच

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अभंगाचा गाथा १३

झिम्मा

अभंगाचा गाथा १२