अभंगाचा गाथा ६
झालों सावध झालों । हरीच्या आलों जागरणा ॥ तेथें वैष्णवांचे भार । जयजयकार गर्जतसे ॥ पळोनियां गेली झोप । होतें पाप आड तें ॥ तुका म्हणे तया ठाया । ओल छाया कृपेची ॥
आता मी सावध झालो आहे म्हणून हरीच्या जागरणाला आलो आहे. त्या जागराच्या ठिकाणी वैष्णवांची गर्दी झाली असून भजनाचा जयजयकार होत आहे. नाम साधनेच्या आड येणारी पापरूपी झोप आता उडून गेली आहे.
तुकाराम महाराज म्हणतात त्या ठिकाणी हरीच्या प्रेमाचा ओलावा आहे आणि कृपेची छाया आहे.
बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय ॥
वीणा कुलकर्णी 🙏
🙏🙏
ReplyDeleteराम कृष्ण हरी
ReplyDelete