Posts

Showing posts from September, 2026

विमान विद्या

Image
       काही दिवसांपूर्वी फेसबुक वर एक पोस्ट वाचनात आली. त्यात त्या सद्गृहस्थांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते जसे की, रावणाकडे खरेच विमान होते कां, सीतामाई चे अपहरण करते वेळी ते कुठे उतरवले होते, रामायणानंतर त्याचे काय झाले, नंतरही अवशेष मिळाले का इ.इ.        खरंतर या विषयांवर त्यातील तज्ञांचे एवढे संशोधन उपलब्ध आहे की या प्रश्नांची सुयोग्य उत्तरे समजून घेतली तर नक्कीच मिळू शकतील.       माझ्याकडे डॉक्टर प. वि. वर्तक यांची पुस्तके आहेत. त्यातील वास्तव रामायण या पुस्तकात त्यांनी चित्रांसकट या विषयावर स्पष्टीकरण दिले आहे.      वाल्मिकी रामायणातील विमाने  खरी आहेत याचे अनेक पुरावे  त्यांनी दिले आहेतच. पण आणखीन एक सात आठ पानांचे एक पूर्ण प्रकरण खास 'भोजराजाची विमानविद्या' या विषयावर आहे.      त्या लेखात शेवटी ते लिहीतात, "महाभारत, रामायण, ऋग्वेद या तिन्ही ठिकाणी विमानांची वर्णने आहेत. श्लोक ८४ येथे भोज म्हणतो की पूर्वीचेच हे ज्ञान मी संकलित करत आहे."       पुढे ते म्हणतात,...