देव पुनः एकदा

     एपिस्टाईन फाईल्स च्या गदारोळामुळे देव आहे की नाही हा संभ्रम मनात तयार झाला. आणि मनानेच त्याला 'तो' आहेच हे ठाम उत्तर दिले.

    आहेच की हो तो माणसा माणसात,  माणसातील चांगुलपणात, प्रेमात  !!!!

    हल्ली ॲगनाॅस्टीक लोकांची संख्या वाढली असावी असे वाटते कारण कुठे तरी वाचले की एक सर्वेक्षण झाले त्यात म्हणे पन्नास टक्के लोक agnostic निघाले. म्हणजे त्यांना देव आहे ही वाटत नाही आणि नाही ही...न्यूट्रल, निर्विकार  !!!

    यात अजून एक सांगायचे म्हणजे अजून एका ठिकाणी वाचल्याप्रमाणे अमेरिकेत agnostic लोकांबरोबरच ऐथिस्ट म्हणजे देवाला न मानणाऱ्या लोकांची संख्याही वाढत आहे. आणि हे नक्कीच भितीदायक आहे.

   कारण देवच नाही मग कसलेही चांगले वाईट काम करताना भिती कोणाचीच उरत नाही. अज्ञातातला देव बघतोय ही संकल्पनाही माणसाला वाईट मार्गापासून परावृत्त करत होती. पण एकदा देव नाहीच मग काय....कसेही वागा. 

   त्यामुळेच देव हवाच आणि तो आहेच.

   पण आपल्याला सध्या तरी घाबरण्याची भिती नाही. कारण मोठ्या दोन तीन पिढ्या अनेक चांगल्या-वाईट प्रसंगातून तावून सुलाखून बाहेर पडल्या आहेत.

  आणि महत्वाचे म्हणजे सध्या प्रत्येक मंदिरात तरूण पिढीची वाढती गर्दी पाहता ' देवा ' बद्दल एवढ्यात तरी घाबरायला नकोय.

    तो आहेच आणि सगळे पहातोय  या वर दृढ विश्वास ठेवा.  

    रामकृष्ण हरी 🙏


  

वीणा कुलकर्णी  🙏🙏

Comments

  1. Tu lihiles te mala patale. Yogyach ahe. Mazha pan devavar vishvas ahe. Rojchya jivanat aplyala tyachi prachiti yetech.

    ReplyDelete
  2. वसंत फडकेFebruary 16, 2026 at 1:13 AM

    माणसांमधला देव ओळखता आला तर फारच चांगले, पण अनेक अतर्क्य गोष्टींमागे कोणती तरी शक्ती कार्यरत असते, हे सत्य नाकारता येत नाहीच. आयुष्यातील अनेक चांगल्या तसेच अप्रिय घटनांमागेही काहीतरी कारण असतेच, चांगल्या घटना देवाचे ( त्या अदृश्य शक्तीचे ) आशीर्वाद समजतो तर अप्रिय किंवा त्रासदायक घटनांमधून तरून जाण्यासाठी त्याकडोच बळ मागतो मग नांव काही दिलं तरी चालेल..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलीबाबाची गुहा..

लापता लेडीज: माणुसकीचे दर्शन

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!!!