देव
सध्या सगळीकडेच इपिस्टाईन फाईल्स ची चर्चा चालू आहे. अर्थात त्यातले मला काही कळत नाही आणि कळून घेण्याची इच्छाही नाही. त्यामुळेच आजच्या लेखाचा तो विषयच नाही.
फक्त सांगण्यासारखे एक म्हणजे त्यात ज्या लोकांची नावे सगळीकडे चर्चेत आहेत त्यामुळे धक्क्यावर धक्के मात्र नक्कीच बसत आहेत तर सांगण्याचा विषय असा की हे सगळे काय चालत आले आहे...मनाला सुन्न करणारे !!!!
अगदी विचार केला तर चेंगीझ खान किंवा त्याआधी पासूनच आणि नंतर ही देशोदेशी झालेले अनेक नरसंहार, ज्यूं चे आणि फाळणीच्या वेळचे नरसंहार आणि आता या फाईल्स मधून उघड होत असलेल्या अनेक धक्कादायक गोष्टींमुळे मती कुंठीत झाली आहे, काही कळतच नाहीये....
लहान बाळांपासून स्त्रीपुरूष, म्हातारे कोतारे अगदी सगळ्यांवरचे अत्याचार बघून मन सुन्न होते.
कुठे आहे देव ?????
खरंच देव आहे का आणि असेल तर एवढ्या भयानक घटना तो घडूच का देत आहे ??
खरंतर मन विषण्ण झाल्यावर सारासार विवेक बुध्दी जागृत होते. सकारात्मक विचारच केले पाहिजेत व अशा भयानक बातम्यांपासून मनाला लांब ठेवले पाहिजे हे कळते.
मग आठवले स्वातंत्र्यवीर सावरकर, किती कठीण प्रसंगाना त्यांनी तोंड दिले आहे.
गरीबांचे, दुःखितांचे तारणहार गाडगेबाबा, बाबा आमटे, इ.इ
आणि आपले सर्वांचे आदरणीय छत्रपती शिवाजीमहाराज!!!
यात अनेक नावे घेता येतील पण आपले सगळ्यांचे लाडके रतन टाटांना विसरून चालणार नाही.
आणि तसा तर देव आपल्या आजूबाजूला वावरत असतोच की, आपल्या आईवडिलांच्या, आपल्या पाठी उभ्या रहाणाऱ्या नातेवाईक, मित्र मंडळाच्या रूपात!!!
तर किती नावे घ्यावीत...पृथ्वीवर चांगुलपणा जास्त आहे म्हणूनच ती अजून तग धरून आहे हे नक्की....
देव नाही कसा तो आहेच आणि या सर्वांच्या रूपात आपल्यात वावरत आहे. तो दिसणे,त्याला ओळखणे आपल्या हातात आहे. मग त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जसा जमेल तसा प्रयत्न करत रहाणे हे मात्र आपण नक्कीच केले पाहिजे.
वीणा कुलकर्णी 🙏🙏
Comments
Post a Comment