झेहन

 काल एक उर्दू शब्द ऐकला... 

'झेहन' म्हणजे आठवणींची जागा !!

आठवणी जिथे जमा करून ठेवल्या जातात ती मेंदूतील जागा !!

ती नायिका आपल्या मुलीला सांगते की झेहन मध्ये फक्त चांगल्या आठवणींनाच  जागा दे. वाईट आठवणी मुद्दामहून आठवू नकोस.

    किती सुंदर वाक्य आहे हे !!!!

पण प्रत्यक्षात तसे होते कां? जाणीवपूर्वक की नकळत आपण नकारात्मकच विचार करतो. वाईट गोष्टीच आठवतो. 

हे असे का होते,ते टाळता येईल कां?

हो, नक्कीच!! पण कसे??

कारण सहसा वाईट आठवणीच लक्षात राहतात. 

    आपण एखाद्या सुंदरशा सहलीला जाऊन आलो आहोत. तिथली सुंदरता, बाग-बगिचे, केलेली मजा सांगण्याअगोदर ,आपण घोड्यावर चढताना घसरलेल्या पायाची आठवण प्रथम सांगतो.

    किंवा एखाद्या छानशा लग्नसमारंभ/कौतुक समारंभा ला जाऊन आल्यावर तेथे जाणवलेल्या त्रुटीच दुसऱ्यांना सांगत बसतो. तो कार्यक्रम कितीही दृष्ट लागण्यासारखा झालेला असो (आपलीच दृष्ट त्याला लागते) वाईट-साईट आठवणीच काढल्या जातात.

    नातेसंबंधातही तेच, कुणी कितीही चांगले वागलेले असो, मदत केलेली असो.... आठवतात फक्त कटू आठवणी!!!! झेहन मध्ये दुर्दैवाने तेच लक्षात राहिलेले असते.

    कितीही चुकीचे, नकोसे वाटले तरी असेच का होते......? देवासमोर प्रार्थनेला बसल्यावर नको तेच विचार मनात यावेत तसे.......

     तर हे खरच टाळता येऊ शकते, अर्थात त्याला खूप प्रयत्नांची जोड असेल तरच !!!!

      मनात नकारात्मक विचार आल्या बरोबर लगेच त्यावर कुरघोडी करत सकारात्मक विचारांनाच आठवायचे. त्या क्षणावर विजय मिळवण्यासाठी एका हाताने दुसर्‍या हाताला घट्ट धरून ठेवायचे, नकारात्मक विचार जाईपर्यंत...अगदी नाहीसे होईपर्यंत !!

      कितीही कठीण असो, तरी जमवायचेच...प्रयत्नांती परमेश्वर!!

     जमते हळूहळू! मध्येच मुळपदावर जातो, पाय घसरतोच पण प्रयत्न चालूच ठेवायचे...मग जमते हळूहळू, सकारात्मकतेचे प्रमाण वाढते, एवढे नक्कीच!!!

   बघूया का प्रयत्न करून??

   'झेहन ' ला सकारात्मक चालना देऊन???


वीणा कुलकर्णी 🙏

Comments

  1. Vasant Govind PhadkeMarch 31, 2022 at 5:50 AM

    खूपच छान,
    सकारात्मक विचारच राहिले की जीवन अधिकाधिक सुंदर होईल .....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अभंगाचा गाथा ११

अभंगाचा गाथा १२

अभंगाचा गाथा १०