अलीबाबाची गुहा..
टीव्हीवरील निरर्थक मालिकांना कंटाळून का होईना मी अचानक युट्यूब कडे वळले.
म्हणजे तसे स्मिता ओक,मधुरा रेसिपी, विष्णू मनोहर, Bristi home, Hebbars Kitchen, IamBhagyashri इत्यादींच्या रेसिपीज बघून घरच्यांवर प्रयोग करत होतेच पण युट्यूब 'ऐकत' नव्हते.
आणि मग मला अलीबाबाची गुहा उघडावी तसा एक खूप सुंदर खजिना गवसला. आणि नंतर मी युट्यूब वरच्या मुलाखतींमध्ये अक्षरशः गुंगून गेले. किती ऐकू आणि किती नको असे होऊन गेले.
प्राध्यापक प्र.के. घाणेकर अत्यंत बहुआयामि व्यक्तिमत्त्व!!! गड, किल्ले, मंदिरे, मूर्ती, वनस्पती इत्यादी,इत्यादी ...किती ऐकावे तेवढे थोडेच.
'घातसूत्र ' कार दीपक करंजीकर (@deepakkaranjikar) यांची व्याख्याने तर थक्क करून टाकतात. त्यांनी केलेले संशोधन, विश्लेषण ऐकताना आपण अक्षरशः मंत्रमुग्ध होतो.
तसेच निलेश ओक (@nileshoak5561) यांचे...त्यांचे महाभारत, रामायणा वरील संशोधन असेच थक्क करणारे. अनेक गोष्टींचा शोध लागल्याचा आनंद मिळतो. तीच गोष्ट प्रवीण मोहन यांच्या व्हिडिओंची.
किती नावे लिहू आणि किती नको 'घेता किती दो करांनी' अशी अवस्था होवून जाणाऱ्या मुलाखती !!!
परत फोन लांब ठेवा, जवळही नको...ऐकायचे तर असते, ते टीव्हीवरून ही ऐकू शकता.
वैशाली करमरकरांचे नाव तर मुख्यत्वे घ्यायलाच हवे.
डॉक्टर बी.एम. हेगडे (@bmhegdefansclub), डॉक्टर जयेश शर्मा (@drjayeshsharma), डॉक्टर नंदू मुलमुले (@nandumulmule) इत्यादीं.
आवड असेल तर....राहुल देशपांडे, अश्विनी भिडे, कुमार विश्वास, महीम तिवारी इ. इ.कधी वेगळे म्हणून छान आहेत.
अथर्व हर्डीकर (@atharvahardikar), कोकणी रानमाणूस (@konkaniranmanus) यांचे कोकणप्रेम पाहून ऊर भरून येतो.
अजून ही असे खूप व्हिडिओज नक्कीच असतील कारण विद्यमानांची कमी नाही पण माझ्या पाहण्यात आलेले हे असे काही व्हिडिओज. हे सर्व पाहताना एक जाणवते, भारतात, मुख्यत्वेकरून महाराष्ट्रात केवढी प्रतिभाशाली माणसे आहेत !!!
त्या सर्वांना माझा मनापासून नमस्कार 🙏.
वीणा कुलकर्णी. 🙏🙏
खरंच यूट्युबवर खूप काही चांगलं ऐकायला मिळतं, मलाही दिपक करंजीकर, निलेश ओक, यांच्याबरोबरच भाऊ तोरसेकर, सुशिल कुलकर्णी, अनय जोगळेकर यांनाही ऐकायला आवडतं, अनय जोगळेकरांमुळे आंतरराष्ट्रीय प्रकरणाबाबतही माहिती मिळते ....
ReplyDelete🙏🙏
धन्यवाद
Deleteखरंच खूप काही चांगलं बघण्या सारखं नि ऐकण्यासारखं असतं. आपली कामं सांभाळून आपल्या आवडीचं जेवढं घेता येईल तितकं घ्यावं..
ReplyDeleteधन्यवाद
DeleteSWATI RANE 04 Jan 26
ReplyDeleteThank you
Delete