कोकण
आपल्यातील खूप जणांचे मूळ कोकणाशी जोडले गेले आहे त्यामुळे कोकणाबद्दल एक वेगळीच आत्मीयता आहे. खूप जणांचे तर लहानपण तेथे गेले आहे,त्यामुळे मोठ्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपण आजही पाळतो.जसे की सोमवारी डोक्यावरून आंघोळ करू नये,अमुक दिवशी तमुक करू नये इ.
रात्री झाडाखाली झोपू नये पण खरतर ही अंधश्रद्धा नाही. कारण रात्री झाडे कार्बन डाय ऑक्साईड सोडतात व ऑक्सिजन घेतात त्यामुळे झाडाखाली झोपणाऱ्याला श्वासाचा त्रास होऊ शकतो.
जुन्या लोकांना कदाचित सायन्स माहित नसेल पण निसर्गज्ञान होते.
या सर्व गोष्टींमधून सुचलेली एक गंमतशीर गोष्ट!!! मजेत मजेत वाचा आणि सोडून द्या ही विनंती.
लहानपणी असे ऐकलेले की झोपताना तहान लागली तर तसेच झोपू नये नाहीतर तहानलेला आत्मा पाणी शोधत शरीरातून बाहेर पडतो. खरतर डिहायड्रेशन होते हे खरे कारण !!!!
तर, या गावातल्या काकूंना झोपताना तहान लागली पण उठायचा आळस केला आणि झोपून गेल्या.....
झाले !!! रात्री पडला की हो आत्मा शरीरातून बाहेर....
स्वयंपाकघरात गेला तर नेमकी एक कळशी उघडी दिसली,त्यात जाऊन पाणी पिऊ लागला.
नेमका त्याच वेळेस तहान लागली म्हणून त्यांचा मुलगा स्वयंपाकघरात आला आणि माठातील थंड पाणी पित असताना कळशी उघडी दिसली म्हणून वर झाकण ठेवले.
झाले !!!! आत्मा अडकला की हो कळशीत !!!!
सकाळ झाली, काकू उठल्याच नाहीत. घरचे जमले, नंतर शेजारी पाजारी जमले.
काकूंना पुढच्या प्रवासाला नेण्याची तयारी सुरू झाली.
त्यांना आंघोळ घालायची म्हणून मुलगा घरातून तीच कळशी घेवून आला. झाकण उघडून तिच्यातील पाणी आता त्यांच्यावर ओतणारच तेवढ्यात काकू उठल्या.....
काय झाले, काय झाले करत !!! मला झोप लागली वाटतं जास्त आज असे म्हणत....
अशी झाली मज्जा...!!
वीणा कुलकर्णी 🙏🙏
अरे! म्हणूनच मेल्यावर अंघोळ घालायची प्रथा सुरू झाली वाटते!!
ReplyDelete