इंटरनेट उपवास

     परवा आमच्या वसंत फडके नावाच्या मित्राने निर्जला एकादशी बरोबर इंटरनेट उपवास ही केला. ही सुंदर कल्पना मनाला खूपच भावली कारण हया इंटरनेट विस्फोट झालेल्या काळात या गोष्टींची खरंच खूप गरज आहे. 

     कारण फेसबुक,वाॅट्स ॲप,इ.इ. मुळे आपण खरंतर आभासी पध्दतीने जोडले गेलोय पण सर्वार्थाने 'जवळ' आलो आहोत का हा प्रश्नच आहे. 

     कारण फेसबुक वर वगैरे जे दाखवले जाते ते खरंच खरे असते का की नुसता दिखावा असतो ? हे असे म्हणावेसे वाटते कारण सध्या सगळीकडेच चर्चेत असलेली सिया गोयल... तिची सोशल मिडीया वेगळेच काही दाखवत होती आणि घडले काही वेगळेच होते..असो. 

    तुम्ही कोठेही जा, बहुतेक लोकांच्या हातात फोन असतातच.  बसथांब्यावर, बागेत अगदी दवाखान्यात ही लोक फोन बघत असतात. रस्त्यातून चालतानाही फोन बघत असतात, त्यातूनच माहीम ला एकावर हल्ला झाला. या सगळ्यात प्रत्यक्ष बोलणे कमी झाले आहे, सगळे ऑनलाईन लाईव्ह मात्र असतात.

    मनोवैज्ञानिकानी हे सगळे काय चालले आहे त्याला नाव दिलेय Loneliness epidemic.

    "Six Degrees of Separation" या सामाजिक सिद्धांताप्रमाणे जगातील कोणत्याही दोन व्यक्ती एकमेकांपासून जास्तीत जास्त ६ ओळखींच्या (किंवा पायऱ्यांच्या) अंतरावर असतात म्हणजेच, जर मला जगातल्या कोणत्याही व्यक्तीपर्यंत पोहोचायचे असेल, तर मी माझ्या  ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून, कमाल ५-६ लोकांच्या साखळीने त्या व्यक्तीशी जोडले जाऊ शकतो.

    वरील सिद्धांताबद्दल राहुल खरे यांच्या लेखात वाचनात आले, ते तसेच लिहीले आहे.

   इंटरनेट मुळे मात्र आपण हजारो लोकांशी जोडले जातो. पण आपण प्रत्यक्ष किती लोकांना खरेखुरे ओळखतो हा मुद्दा राहतोच. त्यामुळे इंटरनेट च्या या खोट्या, आभासी भेटण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न केला पाहिजे, निदान फोनवर तरी बोलले पाहिजे. 

     या सगळ्यासाठी इंटरनेट च्या मायाजालातून थोडावेळ तरी बाहेर पडण्याची गरज आहे,कितीही माहितीपूर्ण माध्यम असले तरीही... आणि हे सगळे मी इंटरनेट च्याच माध्यमातून सांगत आहे,ही अजून एक मजा.

     तर खरंच आपण प्रत्यक्षात वसंत ला follow करूया आणि मध्ये मध्ये इंटरनेट उपवास करूयात..


वीणा कुलकर्णी 🙏🙏

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अलीबाबाची गुहा..

लापता लेडीज: माणुसकीचे दर्शन

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!!!