धिंगाणा....
' स्टार प्रवाह ' वर दर शनिवार रविवार रात्री नऊ वाजता एक कार्यक्रम चालूआहे -
' आता होऊ दे धिंगाणा ' नावाचा !!
खरोखर धिंगाणा कार्यक्रम आहे. मला आधी असे कार्यक्रम आवडत नसत पण हा बघायला सुरुवात केली आणि आता त्यात इतकी गुंतत गेले की तो बघितल्या शिवाय चैन पडत नाही.
आता होऊ दे धिंगाणा सिझन 2 इतका आवडला की सिझन 1 OTT वर बघत आहे.
सिध्दार्थ जाधव खरोखर एक उत्साहाचा सळसळता झरा आहे, त्याची एनर्जी बघून आपल्याही अंगात चैतन्य सळसळावे.
या कार्यक्रमाच्या creative team चे करावे तेवढे कौतुक थोडे इतका सुंदर बसवला आहे हा कार्यक्रम! त्यात सिध्दार्थ जाधव चे सूत्रसंचालन! केवळ लाजवाब!! तो इतका या कार्यक्रमात मिसळून गेला आहे की तो याच साठी बनला आहे इतका चपखल!!!!!
पहिली फेरी असते 'धून टाक'. म्हणजे धून वाजवली जाते आणि गाणे ओळखायचे असते. नंतरची फेरी असते 'बोबडी वळाली' त्यात दिलेल्या शब्दांमध्ये गाणे म्हणायचे असते व त्यांच्या टीम ने ते ओळखायचे असते. तर तिसरी फेरी असते 'रेखाटा पटापटा', यात दोघांनी चित्र काढून दाखवायचे व टीम ने ते ओळखायचे.
शेवटची फेरी तर धमाल मजा असते - ' साडे माडे शिंतोडे '!!! गाण्यातील गाळलेले शब्द ओळखायचे आणि जर ते चुकले तर माईक मधून अंगावर पाण्याचे फवारे उडतात. मजा असते !!!
आणि अजून मजा असते, फेऱ्यांच्या मध्ये देण्यात येणारे टास्क.
काय एकएक टास्क असतो, खूपच मज्जा घेतात सगळेच. Creative team चे करावे तेवढे कौतुक कमीच होईल.
बाकी घंटाघरात जाणे, पैसे आणणे, नकला करणे अशा इतर गमती जमती असतातच.
स्टार प्रवाह वरच्या मालिका बघत नसलो तरी काही फरक नाही. खेळाची मजा लुटताना आपण या सगळ्यांना ओळखत नाही हे जाणवत देखील नाही इतके या कार्यक्रमात गुंग होऊन जायला होते.
एक तास मज्जेत घालवायचा असेल तर हा कार्यक्रम बघावाच लागेल !!!!
वीणा कुलकर्णी 🙏🙏
Ha karyakram mi baghitla nahi. Pudhchya Sat pasun baghen. Parikshan chan.
ReplyDelete