गीता वचन

    श्रद्धेचा आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम या विषयावर एक क्लीप ऐकण्यात आली. 

    त्यात असे म्हटले आहे की, श्रद्धेने तुम्ही मेडीटेशन करत असाल तर त्याचा खूपच सकारात्मक परिणाम तुमच्या मनावर, तब्येतीवर होतो.

    मेडीटेशन करत असताना चांगल्या विचारांचे, तब्येत ठीक होण्याचे असे काही ठोस ध्येय समोर ठेवून जर तुम्ही मनाची शक्ती वाढवलीत तर तुमचे आरोग्य, मन चांगले रहाते, सुधारते.

    त्यासाठी त्या क्लीप मध्ये गीतेच्या १५ व्या अध्यायातील  व्या श्लोकाचे उच्चारण केले आहे. तुम्ही मनाला  पंचेंद्रियांना जिंकून घेवू शकता इतकी शक्ती मेडीटेशन मध्ये आहे.

    गीता अध्याय १५ श्लोक  वा : 

"ज्यांचा मान आणि मोह नष्ट झाला आहे,ज्यांनी आसक्तीरूपी दोष जिंकला आहे, जे नित्य परमात्म्याच्या स्वरूपात स्थित आहेत, ज्यांच्या कामना पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत आणि जे सुख-दुःख नामक द्वंद्वापासून मुक्त आहेत, असे ज्ञानी पुरूष त्या अविनाशी परमपदाला प्राप्त होतात."


रामकृष्ण हरी 🙏


वीणा कुलकर्णी 🙏🙏

Comments

Popular posts from this blog

अलीबाबाची गुहा..

इंटरनेट उपवास

लापता लेडीज: माणुसकीचे दर्शन