वेद-पुराणे
एका ठिकाणी वाचले होते की भारतीय परंपरेनुसार शिष्याने गुरूंना प्रश्न विचारायचे नसतात. गुरू जी आज्ञा करतील ती शिरसावंद्य मानायची.
याउलट एका शास्त्रज्ञाची गोष्ट वाचली होती. ते शाळेत जाणारा मुलगा असताना त्यांची आई रोज ते शाळेतून घरी आले की एक प्रश्न विचारायची, आज तू शिक्षकांना काय प्रश्न विचारलास. त्यामुळेच त्या जिज्ञासेतून, कुतूहलातून एक शास्त्रज्ञ जन्माला आला.
अनेकवेळा पाहूनही समाधान न झालेले दोन इंग्लिश सिनेमे आहेत, Avatar पहिला आणि Doctor Strange.
हे दोनही पिक्चर मला आपल्या संस्कृतीशी खूप जवळचे वाटतात. मला नक्की असे वाटते की त्या सिनेमांच्या लेखकांनी आपल्या वेद पुराणांचा नक्कीच अभ्यास केला असावा. अवतार मध्ये दाखवलेला परकाया प्रवेश आणि डॉक्टर स्ट्रेंज मध्ये दाखवलेली श्रीयंत्र सदृश्य दृश्ये तसेच आपल्या शरीरातील सात आज्ञाचक्रांचा उल्लेख बघून मला तरी तसे वाटते.
अजून ही प्रेमकथां मध्येच अडकलेल्या बाॅलीवूड बद्दल न बोललेलेच बरे. साऊथ बद्दल विशेष माहिती नाही पण क॔तारा सारखा सिनेमा त्या इंडस्ट्रीचा वेगळेपणा नक्कीच दाखवून देतो.
पण खरी कमाल तर मराठी इंडस्ट्रीने केली आहे. दशावतार सारखा एकच सिनेमा सगळ्याला उत्तम उत्तर देतो.
आपल्या वेद पुराणांमध्ये सगळेच आधी लिहून ठेवले आहे असे आपल्याला वाटते आणि याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आणि तो असायलाच हवा. पण पाश्चात्यांमध्ये असलेली जिज्ञासू वृत्ती कदाचित आपल्यात कमी आहे का ? त्यामुळे नवनवीन शोध लागण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
विमान विद्या वेदांमध्ये होतीच. तसेच शून्याचा शोध, फिबोनासी,आयुर्वेद इत्यादी अनेक गोष्टींबद्दल भारतीयांनाच सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टर माशेलकरांनी हळदीच्या पेटंट साठी केलेला संघर्ष आठवून बघा.
आपल्या वेद पुराणांमधील अमूल्य ज्ञान सगळ्या जगासमोर आपल्याच नावाने आले पाहिजे आणि सगळ्या जगाला त्याचा उपयोग झाला पाहिजे असे मनापासून वाटते.
वीणा कुलकर्णी 🙏
👍
ReplyDelete