गोष्ट समजूतीची
सगळ्याच नात्यांमधे एकमेकांना समजून घेण्याची खूप गरज असते तरच ती टिकून रहातात. रागाने, द्वेष करून नाती टिकत नाहीत. मग ते नवरा बायकोचे असो वा कुठलेही !!
तर हल्ल्ली किती भयानक बातम्या कानावर पडत आहेत, त्या ऐकूनच अंगावर शहारा येतो.
कुणी ड्रमात तर कुणी फ्रीज मध्ये तर कुणी सुटकेस मध्ये मारून ठेवले नंतर ऐकू आले की एकीने होणाऱ्या नवर्याला सरळ गडावरून खालीच ढकलून मारले.
ऐकतानाही किती भयानक वाटते. कसा धजावत असेल जीव अशी भयंकर कृत्ये करायला ? काय मनोधारणा असेल अशा प्रवृत्तींची ?
तर मुद्दा या भयानक लोकांचा नाही तर आमिर खान चा आहे. बघा ना तीन तीन लग्न केली. तिसऱ्या लग्नाला पहिल्या दोन्ही बायका आपापल्या मुलांसहित हजर होत्या, म्हणे !! अर्थात हे सगळे ऐकीवच हं...आपल्याला तर बोलावणे नव्हते बाबा !! तर अजून एक मजा तिसऱ्या लग्नात तिसरी बायको आपल्या पहिल्या मुलाला घेऊनच होती.
त्याच्या पहिल्या बायकोच्या मुलीच्या लग्नात दोन्ही घटस्फोटित बायका मस्त नऊवारी नेसून मिरवत होत्या म्हणे....कारण जावई मराठी.
तेच हृतिक रोशन चे. सुझान खान बरोबर घटस्फोट होवून ही आपापल्या सध्याच्या पार्टनरना घेऊन चौघेजणं मस्त एकत्र पार्ट्या करत असतात म्हणे !!!
सगळे ऐकीवच हं परत. इकडून तिकडून वाचलेले, रील वर पाहून आलेले ज्ञान.
तर महत्वाचे काय या सगळ्यांकडून खूप शिकण्यासारखे आहे. घटस्फोट झाला म्हणून काय बिघडले. दूर राहून एकमेकांशी खूप छान संबंध त्यांनी जपले असावेत असे वाटते.
ड्रम, फ्रीज इत्यादींचा कशाला भयानक गोष्टींसाठी वापर करावा. समजूतीने वेगळे होवून एकमेकांचा आदर करावा.
आमिर, हृतिक अशा लोकांच्या गोष्टीच वेगळ्या. पण त्यांच्यासारखे समजूतीने वागणे आपण सगळ्याच नातेसंबंधांत आचरणात आणू शकतो. त्यामुळे नात्यांमधील ताणतणाव सहजच कमी होवू शकतील असे वाटते.
वीणा कुलकर्णी 🙏🙏
👍
ReplyDelete